जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:36+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा रोहित सुरेश कापगते याने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८३ गुण आणि क्रीडाचे ५ असे एकूण ९७. ६० टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

Top in District Division, Rocks in Girls Result | जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स

जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स

Next
ठळक मुद्देआता मिशन अ‍ॅडमिशनकडे लक्ष : मागील वर्षीच्या तुुलनेत टक्केवारीत वाढ, ग्रामीण भागातील शाळांची टक्केवारी सुधारली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल स्थानी आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालात सुध्दा मुलींनीच बाजी मारली असून ९६.८६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहे. तर ९३.६३ टक्के मुल उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे नागपूर विभागात गोंदिया जिल्हा टॉप तर रिझल्टमध्ये गर्ल्स रॉक्स ठरल्या आहेत.
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा रोहित सुरेश कापगते याने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८३ गुण आणि क्रीडाचे ५ असे एकूण ९७. ६० टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयाची श्रेया रहांगडाले हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४७७ आणि क्रीडाचे ५ असे ९७.४० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. गोंदिया येथील मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूलचा विद्यार्थी हर्षीत कटरे यांने ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. तर वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयाची विद्यार्थिनी कृणाली टेंभरे हिने सुध्दा ९७.२० टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.
दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल स्थानी आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीत सुध्दा मुलींनीच बाजी मारली असून ९६.८६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.९३.६३ टक्के मुुले उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.२२ टक्के लागला आहे.
दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २० हजार ५२९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९७९४ विद्यार्थी तर ९७५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.६३७१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीण झाले. प्रथम श्रेणीत ७८४२ तर व्दितीय प्राविण्य श्रेणीत ४४८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला.
मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात २६.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. तर यंदा यात सुधारणा झाली असून ८७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे चित्र आहे.
यंदा जिल्ह्याच्या दहावीच्या निकालात सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांची टक्केवारी सुधारली आहे. तर सात हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हे प्राविण्य क्षेणीत उत्तीर्ण झाले आहे. दर्जेदार शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शहरातील शाळां महाविद्यालयात दाखल करीत आहेत. त्यातच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याने ही निश्चित ग्रामीण भागातील पालकांसाठी सुध्दा दिलासादायक बाब आहे. शिक्षण विभागाने सुध्दा थोडे लक्ष दिल्यास यात अधिक सुधारणा होवू शकते.

८७ शाळांचा निकाल शंभर टक्के
दहावीच्या निकालात यंदा सडक अर्जुनी तालुक्यांने आघाडी घेतली आहे. या तालुक्याचा एकूण निकाल ९७.६९ टक्के लागला आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे चित्र आहे. यंदा ८७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ही निश्चित जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
निकाल
सुधारला व टक्केवारीत वाढ
च्मागील वर्षी गोंदिया जिल्ह्याचा दहावीचा निकाल ६८.५५ टक्के लागला होता. मात्र यंदा जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला असून २६.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालाची टक्केवारी यंदा सुधारणा झाली आहे. ७८४२ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उर्तीण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.

Web Title: Top in District Division, Rocks in Girls Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.