आवास योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया विदर्भात टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:26+5:30
घरकुल बांधकाम दिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राज्यभरातील पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यासाठी गोंदिया पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जे.एस.इनामदार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या अधिनस्त अधिकाºयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेची गोंदिया पंचायतीने प्रभावीपणे अंमलबजावणी करुन तीन महिन्यात ४ हजार ६३० घरकुलांचे बांधकाम पूर्ण करुन विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. तर राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त केला. याबद्दल बुधवारी (दि.२०) पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
घरकुल बांधकाम दिवसानिमित्त मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राज्यभरातील पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यासाठी गोंदिया पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जे.एस.इनामदार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या अधिनस्त अधिकाºयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. गोंदिया पंचायत समितीने त्यांच्या क्षेत्रात येणाºया गावांमध्ये तीन महिन्यात ४ हजार ६३० घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले.तसेच विदर्भात तीन महिन्याच्या कालावधीत ऐवढ्या घरकुलाचे बांधकाम करणारी गोंदिया पंचायत समिती ही विदर्भातील एक पंचायत समिती ठरली आहे. विशेष म्हणजे २० नोव्हेबंर रोजी घरकुल दिवसाचे औचित्य साधून छिपिया येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ज्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले अश्या एकूण १५० लाभार्थ्यांच्या आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्थापत्य अभियंता (सहायक) आर.आर.पारधी सरपंच यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने सरपंच संघटनेचे अध्यक्ष मुनेश्वर रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता दुर्गेश रहांगडाले, सरपंच शालू परतेती, कटंगटोलाचे सरपंच कावरे, परसवाडाचे सरपंच देवेंद्र हरिणखेडे, पांजराचे सरपंच चेतन नागपुरे, झिलमिलीचे सरपंच राधिका कावरे, उपसरपंच चेतन बहेकार उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी पंतप्रधान आवास योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पंचायत समितीच्या अधिकारी व सरपंच व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन बाबा चौधरी यांनी केले.