टोयागोंदी विभागात अव्वल
By Admin | Published: August 3, 2016 12:10 AM2016-08-03T00:10:37+5:302016-08-03T00:10:37+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती करीत सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त....
सर्वाधिक मनुष्यदिन निर्मिती : रोजगारमंत्र्यांनी केले पुरस्कृ त
दरेकसा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती करीत सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त टोयागोंदी ग्रामपंचायतने विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सन २०१५-१६ या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत टोयागोंदीने नागपूर विभागात सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती केली. याबद्दल राज्याच्या नियोजन विभागाकडून (रोजगार हमी योजना) २९ जुलै रोजी मुंबई येथे रोजगार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सरपंच गिता लिल्हारे व सचिव मेश्राम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्काराबद्दल मधूकर ओक्टे, पुरूषोत्तम पडौती, भरत लिल्हारे, संतोष पंधरे, अनिल फुंडे, ओमप्रकाश लिल्हारे, रवी सोनवाने परिसरातील नागरिकांनी कौतूक केले आहे. (वार्ताहर)