तंटामुक्त समित्यांना व्यसनमुक्तीचा ध्यास
By Admin | Published: May 23, 2017 12:58 AM2017-05-23T00:58:49+5:302017-05-23T00:58:49+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. या चळवळीने गावाचे स्वरूप पालटू लागले.
२३३ ग्रामपंचायती : व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. या चळवळीने गावाचे स्वरूप पालटू लागले. तंटामुक्त गावानंतर नागरिकांनी आपले गाव आदर्श करण्यासाठी व्यसनमुक्त गावाची संकल्पना सुरू केली. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ पैकी २३३ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबविण्यास पुढे आल्या आहेत. तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने गावे व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहेत.
गावात शांतता व सौहार्द नांदावे यासाठी अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद करून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. इतकेच नव्हे, तर आता दारू विक्रीच बंद नाही तर गाव व्यसनमुक्त असावे, यासाठी समित्यांनी पुढाकार घेतला. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ पैकी २३३ गावे व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबवीत आहेत. गावात सर्वाधिक वाद दारूमुळे उद्भवतात. जर, जोरू व जमिनीपासून होणारे वाद आता तंटामुक्त मोहिमेमुळे कमी झाले असले, तरी दारूमुळे होणाऱ्या वादांची संख्या अधिक आहे. दारूला गावातून नष्ट करण्यासाठी गावागावांत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी दारूबंदी समित्या गठित करून आपल्या गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद केली. दारूबंदी समितीच्या आड होत अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री केली तर दंड आकारला. वेळ पडल्यास पोलिसांच्या मदतीने त्यांना तुरुंगातही पाठविण्याची तयारी समित्यांनी दाखविली.
नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १२ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ४५ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ५ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ४ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत १३ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ४ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत २९ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १३ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २८ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ४२ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १९ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ११ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ५७ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १८ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ४५ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २३ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ३१ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १२ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत २ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत २९ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी ९ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ७८ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २९ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ६० ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी ३१ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ५७ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १४ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील २३३ गावांनी व्यसनमुक्तीची धुरा खांद्यावर घेतली आहे.