१३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:47 PM2018-09-17T21:47:06+5:302018-09-17T21:48:07+5:30

जि.प. च्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०४९ पैकी तब्बल १३० शाळेच्या परिसरातून जीवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जीवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता.

A touch of living electrodynamics to 130 ZP schools | १३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

१३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्यांवरील संकट होणार दूर : ऊर्जा मंत्र्यांनी घेतला पुढाकार

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जि.प. च्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०४९ पैकी तब्बल १३० शाळेच्या परिसरातून जीवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जीवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता.
चिमुकल्यांवरील हे संकट दूर करण्यासाठी जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत ठराव पारीत करवून घेतला. यासंदर्भात रविवारी (दि.१६) ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शाळांवरील विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाºयांना निर्देश दिले. त्यामुळे चिमुकल्यांवर संकट टळणार आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत चालविण्यात येणाºया सुमारे १५० शाळा इमारतीवरुन विजेच्या जिवंत तारा गेल्या आहेत. असून अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफार्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली तर मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० आॅगस्ट २०१७ ला ठराव करुन पाठपुरावा सुरु केला होता. विद्युत विभागाने सर्व्हेक्षण करुन येणाºया खर्चाचे आराखडे तयार केले होते. पण निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच प्रलंबित होता. परंतु नुकतेच उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याने हा प्रश्न मार्गी लागला अशी माहिती जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिली.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १३० शाळांच्या इमारतीवरुन विजेच्या वाहिन्या (तार) गेल्या आहेत. कित्येक शाळांच्या आवारात ट्रान्सफार्मर लागले आहेत.
शाळांच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याने ते काढण्यात यावे. असा प्रस्ताव जि.प.च्या सर्वसाधारण सभेत परशुरामकर यांच्यासह इतर सदस्यांनी ठेवला होता. त्यानुसार विद्युत मंडळाने कारवाई सुरु करुन सर्व्हेक्षण तयार केले.
वीज मंडळाला या कार्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले. एवढा निधी आणायचा कुठून हा प्रश्न जि.प. समोर व वीज कंपनीकडे उभा ठाकला होता. मात्र राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
तसेच शाळांच्या इमारतीवरुन गेलेल्या विद्युत तारा त्वरीत हटविण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
६ कोटी ५० लाख खर्च करण्याचे निर्देश
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गोंदिया दौऱ्यावर आले असता त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अडीअडचणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व जि.प. सदस्यांची संयुक्त सभा बोलावली होती. सभेत सर्वप्रथम जि.प. सदस्य परश्ुरामकर यांनी बावनकुळे यांच्या समोर हा गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बावनकुळे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वीज कंपनीच्या अधिकाºयांकडून सविस्तर माहिती घेतली. या कामासाठी लागणारे ६ कोटी ५० लाख रुपये पूर्व विदर्भासाठी असलेल्या निधीमधून तातडीने खर्च करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. बावनकुळे यांनी दखविलेली तत्परता व उपलब्ध करुन दिलेला निधी पाहता भविष्यात निर्माण होणारे संकट टळतील असे सांगत परशुरामकर यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांचे आभार मानले.
तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळांवर वाहिन्या
चिमुकल्या विद्यार्थ्यांवर संकट ओढावणाऱ्या जिवंत विद्युत वाहिन्या व ट्रान्सफार्मरची चौकशी केली असता तिरोडा तालुक्यातील ३६ शाळांच्या आवारातून ह्या वाहिन्या गेल्या आहेत. त्या पाठोपाठ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २५ शाळा, आमगाव २१ शाळा, सडक-अर्जुनी १९ शाळा, सालेकसा १२ शाळा, गोंदिया १० शाळा, देवरी ५ शाळा तर गोरेगाव तालुक्यातील २ शाळा अश्या एकूण १३० शाळांचा समावेश आहे.

Web Title: A touch of living electrodynamics to 130 ZP schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.