अनाथांना तीळगुळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:33 AM2018-01-17T00:33:24+5:302018-01-17T00:33:38+5:30
जन्मदात्या मायबापांना मुकलेल्या मुलांना पोरकेपणा वाटू नये. भारतीय संस्कृतीमधील येणाºया सणाच्या दिवशी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावर ईतर मुलांप्रमाणे आनंदाची व उत्साहाची चमक राहावी म्हणून गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी मकरसससंक्रांतीच्या दिवशी....
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापांना मुकलेल्या मुलांना पोरकेपणा वाटू नये. भारतीय संस्कृतीमधील येणाऱ्या सणाच्या दिवशी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावर ईतर मुलांप्रमाणे आनंदाची व उत्साहाची चमक राहावी म्हणून गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी मकरसससंक्रांतीच्या दिवशी अनाथ मुलांच्या घरी येवून त्यांना तीळगुळ व फराळाचे वाटप केले. त्यांच्या सोबत काही क्षण घालवून एकप्रकारे जन्मदात्या मायेची माया देण्याचा विलक्षण योग साधला.
परिसरातील बाक्टी, इंझोरी, सोमलपूर व निमगाव येथे अनाथांचे जीवन जगत असलेल्या १३ मुला-मुलींना सर्वोत्तोपरी मदत करण्याचे दायित्व सविता डॉ. बेदरकर यांनी स्विकारले आहे. जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावलेल्या अनाथ मुलांना समाजातील दानदात्यांकडून मदत व्हावी ही अपेक्षा अंगीकारुन दैनिक लोकमतच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. लोकमतच्या वृत्ताला वाढता प्रतिसाद मिळून आजही परिरातील १३ अनाथ मुलांना रोख रक्कमेसह अन्नधान्य, किराणा, शालेय साहित्य, गणवेश यासारखी मदत मिळवून देण्यासाठी डॉ. बेदकर प्रयत्नशील आहेत. स्थानिक लोकमत प्रतिनिधीमार्फत त्यांच्या घरापर्यंत साहित्य सामुग्री पोहोचविल्या जात आहे. भारतीय सण व उत्सवा दरम्यान त्यांना जन्मदात्यांची उणीव भासू नये याची काळजी डॉ. बेदरकर घेत असतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी अनाथ मुलांना एकाकी वाटू नये. त्यांच्या आनंदात उत्साहाची भर पडावी. त्यांच्यासोबत काही वेळ घालवून त्यांच्याशी हितगूज साधून त्यांना जन्मदात्यांचे प्रेम दयावे, मायेची थाप त्यांच्या पाठीवरुन फिरवावी याच अभिलाषेने डॉ. बेदरकर यांनी आपल्या ५ वर्षीय अर्जव धनेंद्र भुरले या मुलासह त्या अनाथांच्या घरी भेट दिली. त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस अनाथ मुलांच्या सोबत साजरा केला. निमगाव व बाक्टी येथे अनाथ मुलांना तिळगुळ तसेच फराळाचे वाटप केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच भानुदास वळगाये, उपसरपंच गुलशन सांगोळे, सदस्य हितेश शहारे, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मेश्राम, विक्रम मेश्राम तसेच बाक्टीच्या अनाथ मुलांना मदत मिळविण्यासाठी सामाजिक दायित्व पार पाडणारे जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक कैलाश हांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदियावरुन आणलेले साहित्य डॉ. बेदरकर यांच्या हस्ते ११ अनाथ मुलांना वाटप करण्यात आले. तसेच तांदुळ व तेलही दिले.