कृषी उन्नती योजनेतून मिळणार ट्रॅक्टर व औजारे

By admin | Published: August 4, 2016 12:13 AM2016-08-04T00:13:32+5:302016-08-04T00:13:32+5:30

सन २०१४-१५ पासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी

Tractor and Equipment from Agriculture Improvement Scheme | कृषी उन्नती योजनेतून मिळणार ट्रॅक्टर व औजारे

कृषी उन्नती योजनेतून मिळणार ट्रॅक्टर व औजारे

Next

२५ आॅगस्टपर्यंत अर्ज करा : इतरही अनेक औजारांचा समावेश
गोंदिया : सन २०१४-१५ पासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. ट्रॅक्टर, पावर टिलर, भात लावणी यंत्र, स्वयंचलीत यंत्रे, रिपर, एम.बी.प्लाऊ, डिस्क प्लाऊ, कल्टीवेअर, रोटावेटर, पीक संरक्षण उपकरणे, मनुष्यचलीत अवजारे यांचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत कृषी अवजारांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व इतर घटकांच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान देण्यात येते. कृषी अवजारामध्ये ट्रॅक्टर ८ ते २० एचपी करिता- अनुसूचित जाती, जमाती व महिला लाभार्थ्यांसाठी एक लाख रूपये अनुदान व इतर लाभार्थ्यांसाठी ७५ हजार अनुदान. ट्रॅक्टर २० ते ७० एचपी करिता- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी एक लाख २५ हजार रुपये, इतर लाभार्थ्यांसाठी एक लाख रु पये. पॉवर टिलर ८ एचपीपेक्षा कमी- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ५० हजार रु पये व इतर लाभार्थ्यांसाठी ४० हजार रु पये. पावर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ७५ हजार रु पये व इतर लाभार्थ्यांसाठी ६० हजार रु पये. भात लावणी यंत्र- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ९४ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी ७५ हजाररु पये किंवा ४० टक्के.
रीपर कम बार्इंडर- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी एक लाख २५ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी एक लाख रु पये किंवा ४० टक्के. रिपर- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ६३ हजार रूपये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपये किंवा ४० टक्के. प्लाऊ/डिस्कप्लाऊ/कल्टीवेटर/रीजर- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी १५ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी १२ हजार रूपये किंवा ४० टक्के. रोटावेटर- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ३५ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी २८ हजार रु पये किंवा ४० टक्के. थ्रेशर ५ एचपी पेक्षा जास्त- ६३ हजार किंवा ५० टक्के, इतर लाभार्थ्यांसाठी ५० हजार रु पये किंवा ४० टक्के. नॅकसॅक स्प्रेअर (८ ते १२ लिटर)- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ६ हजार रु पये व इतर लाभार्थ्यांसाठी ५ हजार रु पये. पावर नॅपसॅक स्प्रेअर (८ ते १२ लिटर)- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ३१ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी २५ हजार रु पये किंवा ५० टक्के आणि पॉवर नॅपसॅक स्प्रेअर (१२ ते १६ लिटर)- अजा, अज व महिला लाभार्थ्यांसाठी ३८ हजार रु पये किंवा ५० टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी २५ हजार रु पये किंवा ५० टक्के. याप्रमाणे कृषी अवजारांवर लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांनी वरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहीत नमून्यात अर्ज करावा. संपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत जोडून २५ आॅगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे. अर्जासोबत सात-बारा, आठ-अ चा दाखला, अनुसूचित जाती, जमाती व इतर प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ नागपूर यांच्याकडील साहित्याचे कोटेशन सोबत द्यावे. प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य तत्वावर प्रवर्गनिहा लाभ देण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल. लाभार्थ्यास अनुदान थेट त्याच्या खात्यावर जमा करावयाचे असल्याने सुरूवातीला साहित्याची संपूर्ण रक्कम साहित्य खरेदी करताना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ नागपूरकडे भरावी लागेल. ज्या ब्रँडची मागणी कोटेशननुसार केली असेल तेच ब्रँड खरेदी करावे लागेल. एका लाभार्थ्यास एकदाच लाभ दिला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tractor and Equipment from Agriculture Improvement Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.