ट्रॅक्टर चोरी प्रकरणात चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:15 PM2019-02-15T22:15:43+5:302019-02-15T22:16:18+5:30
ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत.
सविस्तर असे की, फिर्यादी धुरेंद्र विष्णू नागपुरे (३२,रा.लोधीटोला) यांचा एमएच ३५- एजी १९४३ क्रमांकाचा ट्रॅक्टर २० जुलै २०१८ रोजी रात्री घराच्या अंगणातून चोरी गेला होता.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलीसांनी भादंवीच्या कलम ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाच्या तपासांतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि.१३) तुरणकर उर्फ कारू महगादेव भदाडे (३७,रा.धामनेवाडा) याला ताब्यात घेतले. भदाडे याच्याकडे फिर्यादी नागपुरे यांच्या ट्रॅक्टरसह अन्य एक बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर मिळून आला.
यावर पोलिसांनी भदाडेला विचारपूस केली असता त्याने, पंकज उर्फ मोनू गोविंद अग्रवाल (३०,रा.वसंतनगर,गोंदिया), मदन इस्तारी चांदेकर (४५,रा.पाटीलटोला,आसोली) व राजू उर्फ सोनू हेमराज सोनबरसे (२८,रा.लोधीटोला) यांची नावे सांगीतली. त्या आधारावर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये सांगीतली जात आहे.
यातील एक ट्रॅक्टर फिर्यादीचा असून दुसरा ट्रॅक्टर मात्र कुणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस चौैघांकडे विचारपूस करीत आहे. पोलीस अधीक्षक हरिष बैजल व उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडाचे ठाणेदार गणेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक दळवी, सहायक फौजदार खोब्रागडे, शिपाई शेंडे, पिपरेवार यांनी ही कामगिरी केली.