पोलिसांचे पथसंचलन

By admin | Published: September 16, 2016 02:43 AM2016-09-16T02:43:03+5:302016-09-16T02:43:03+5:30

शहरात विसर्जनासह सर्व धार्मिक सण, उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता आम्ही सज्ज आहोत, असा संदेश

Traffic of police | पोलिसांचे पथसंचलन

पोलिसांचे पथसंचलन

Next

पुढच्या वर्षीसाठी साकडे : विसर्जन स्थळांवर एकच गर्दी, निर्माल्य दानासाठी फिरला रथ
गोंदिया : ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत तमाम गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरूवारी (दि.१५) निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुकांची धूम दिसत होती. गुरूवारी सर्वाधिक विसर्जन असल्याने विसर्जनस्थळांवर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांसह आपत्ती निवारण पथक सज्ज होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरळीतपणे सुरू होते.
मांगल्य आणि उत्साहाचे प्रतिक असलेल्या गोंदियाच्या गणेशोत्सवाची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. शहरातील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शान ठरत आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास दरवर्षी येतात. ५ सप्टेंंबर रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे १० दिवस नवचैतन्याचे भारून गेले होते. त्यामुळेच गणरायाला निरोप देताना भक्तगण भारावून गेले होते.
गुरूवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे बघावयास मिळाले. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्षात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचे दिसले. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आकर्षणाचे केंद्र होत्या. ढोलताशांच्या तालावर नाचत ‘गणपती बाप्पा मोरया...’ चा जयघोष करीत मिरवणुका निघत होत्या. (शहर प्रतिनिधी)

पोलिसांचा चोख बंदोबस्त
४विसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्यासोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय मार्शल पेट्रोलींग तसेच निर्भया पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.

गुरूवारी सर्वाधिक विसर्जन
४व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार १४ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन १९ तारखेला होणार आहे. यात मात्र गुरूवारी (दि.१५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी २६ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खासगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Traffic of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.