वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिर

By admin | Published: October 24, 2015 01:50 AM2015-10-24T01:50:54+5:302015-10-24T01:50:54+5:30

जागतिक सेवा सप्ताहाच्या श्रृंखलेत लायन्स क्लब तिरोड्याच्या वतीने वाहतूक नियमावलीबद्दल जनजागृती अभियानांतर्गत लॉयन्स ...

Traffic Safety Guidance Camp | वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिर

वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिर

Next

तिरोडा : जागतिक सेवा सप्ताहाच्या श्रृंखलेत लायन्स क्लब तिरोड्याच्या वतीने वाहतूक नियमावलीबद्दल जनजागृती अभियानांतर्गत लॉयन्स क्लबच्या टीमने सोमवारी पोलीस ठाणे तिरोडा येथे भेट दिली.
या कार्यक्रमाला तिरोडा क्षेत्राचे उपअधीक्षक डी.एम. इलमकर यांनी सबळ पाठिंबा देऊन एन.सी.सी. कॅडरचे विद्यार्थी व उपस्थित लोकांना वाहतूक नियमावलीबद्दल उत्कृष्टरीत्या संबोधन केले. लायन्स क्लब तिरोडा टीमच्या विनंतीवरुन त्यांनी दोन पोलीस निरीक्षक व काही हवालदारांचे पथक प्रदान करुन शहरातील अवंतीबाईच्या पुतळ्यासमोरील चौकात जनजागृती अभियानांतर्गत वाहन चालकांना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक नियमावलीची सविस्तर माहिती देण्यात आली.
नियमांचे पालन न केल्यास धोके निर्माण होऊन लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागेल, याला आळा घालण्यासाठी दंड दिला जातो. याचीही माहिती देण्यात आली. याशिवाय वाहतुकीची नियमे व चिन्हे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. प्रणय भांडारकर यांनी केले.
याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने प्रेमकुमार रहांगडाले (अध्यक्ष), अ‍ॅड. प्रणय भांडारकर (सचिव), राजू बुराडे (कोषाध्यक्ष), उमा हारोडे, अमृत देशपांडे, अशोक मिश्रा, प्रकाश गेडाम, प्रकाश ग्यानचंदानी, अ‍ॅड. अजय यादव, सुशील बैस, पवन वासनिक, गणेश बघेले, स्वानंद पारधी, संजीव कोलते, सोनाली देशपांडे, किरण यादव, कल्पना हारोडे, स्रेहल भांडारकर, सुप्रिया वासनिक, कृपा कोलते, मोहन बचवानी, विजय येरपुडे, अनुप बोपचे, संगीता बोपचे, अर्चना बुराडे, आराधना मिश्रा, शीतल बैस व आशा रहांगडाले यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Traffic Safety Guidance Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.