वाहतुकीस अडथळा, वाहन चालकांवर गुन्हा दाखल
By admin | Published: December 9, 2015 02:10 AM2015-12-09T02:10:22+5:302015-12-09T02:10:22+5:30
रस्त्यावर वाहन उभे करुन वाहतुकीस अडथडा करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
गोंदिया : रस्त्यावर वाहन उभे करुन वाहतुकीस अडथडा करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
केशोरी पोलिसांनी केशोरी येथील चौकात उभी असलेली काळी-पिवळी एम.एच. ३५/३११६ या वाहनाचा चालक आशिष खा रहमान खा पठान (२६) रा. राजोली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई अर्जुनी मोरगाव पोलिसांची आहे.अर्जुनी मोर येथे रस्त्यावर उभा असलेला ट्रक एम.एच. ३१ सी.क्यू.२४१३ चा चालक सुनीलरामजी उके (४५) रा. वाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवेगावबांधच्या टी-पार्इंटवर उभी असलेली काळी-पिवळी एम.एच. ३५/२५६४ चा चालक मुन्ना जयसिंह कयाम (४३) रा. कान्होली, नवेगावबांधच्या वनविभागाच्या कार्यालयासमोर वाहन क्रमांक एम.एच.३६/३०२९ या वाहनाला आरोपी आदेश यशवंत लांडे (३३) रा. गोठणगाव याने रस्त्यावर उभी करुन ठेवली होती. तसेच नवोदय विद्यालयासमोर उभे असलेले वाहन एम.एच. ३५ टी.सी. ९२ या वाहनाला आरोपी माधोराव लक्ष्मण लंजे (३५) रा. कवठा यांनी रस्त्यावर उभे करुन ठेवले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथडा निर्माण झाला होता. या वाहन चालकावर संबंधित पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(तालुका प्रतिनिधी)