तिरोडा एसडीओंकडून नाहक दिला जातोय त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2016 12:21 AM2016-10-20T00:21:57+5:302016-10-20T00:21:57+5:30
स्थानिक शहरालगत असणाऱ्या पेट्रोल पंपावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सात ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केले.
ट्रकमालकांचा आरोप : रॉयल्टी असूनही कारवाई
तिरोडा : स्थानिक शहरालगत असणाऱ्या पेट्रोल पंपावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सात ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केले. मात्र त्यांच्याकडे नागपूरची रॉयल्टी असतानाही एसडिओ यांच्याकडून नाहक त्रास देण्यात आल्याचा आरोप ट्रक मालकांनी केला आहे.
तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी रॉयल्टी खरी की खोटी याची चौकशी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी नागपूर यांना पत्र लिहून चौकशी केली. त्यानंतर रॉयल्टी खरी असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली.
या प्रकरणात आम्हाला विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप पद्माकर पोहरे नागपूर, रुपेश गुरनुले यांनी लोकमतजवळ व्यक्त केला. त्याचे मते प्रत्येक रॉयल्टीवर स्वाक्षरी नसते, क्रमांक आहे. त्यामुळे आम्हा व्यवसायिकांना अधिकाऱ्यांनी त्रास देऊ नये.
तसेच उभ्या असलेल्या गाड्या पकडण्याचा अधिकार त्यांना नसून मालक, चालक असताना कागदपत्राची तपासणी करून परस्पर घेऊन जाणे योग्य नाही असे मत व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)