संभाव्य तीन लाट कमी करण्यासाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:41+5:302021-09-06T04:33:41+5:30
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी बघता तसेच विशेषज्ञांनी तिसरी लाट येण्याची संभावना व्यक्त केली आहे. त्याकरिता ...
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी बघता तसेच विशेषज्ञांनी तिसरी लाट येण्याची संभावना व्यक्त केली आहे. त्याकरिता तिसरी लाटेचा धोका कसा कमी करता येईल, त्याकरिता आपण समाजाची सुरक्षाकरिता किती सजग असायला पाहिजे याकरिता हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. जितेंद्र वाळके यांनी, कोविड विषाणू आपल्या शरीरातील फुफ्फुसापर्यंत कसा प्रवेश करतो व आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो यावर माहिती दिली. तसेच डॉ. टी. डी. कटरे यांनी ऑक्सिमीटर, कॉन्सट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडरचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राजेश पर्वतकर यांनी आहार-विहार, योगा व प्राणायामबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाला एन. के. अंबुले, तालुका संघचालक, डॉ. रमेश सोनी, जिल्हा कार्यवाह प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. संचालन सेवाप्रमुख नरेंद्र बहेटवार यांनी केले. आभार नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी मानले.