बाल संरक्षण समिती सदस्यांची प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:04+5:302021-03-22T04:26:04+5:30
कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. पी. एम.गंगापरी, विस्तार अधिकारी ...
कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. पी. एम.गंगापरी, विस्तार अधिकारी सी.एच.गौतम, पोलीस उपनिरीक्षरक ए.डी.केंद्रे उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे प्रास्तविक प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी यांनी मांडले. त्यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्त्व पटवून दिले. तसेच बालविवाह व दत्तक विधान प्रक्रिया बालविवाह पॉक्सो कायदा लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण २०१२ यावर बालसरंक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी मार्गदर्शन केले. समुपदेशक दिनेश कावडकर यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण २०१२ या विषावर प्रकाश टाकला. संरक्षण अधिकारी संजय शामकुवर यांनी मजुरी या विषयी माहिती दिली. संचालन पुनेश नाकाडे यांनी केले तर आभार धर्मेंद्र भेलावे यांनी मानले. प्रशिक्षणाला पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.