शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:17+5:302021-06-26T04:21:17+5:30

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा आमगाव : गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी ...

Trampling the corona rules in the city | शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

googlenewsNext

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धानपिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय; पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला.

शिपाईपद भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार असून, ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.

वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याची वनतस्करांनी संधी साधून जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचेही जीव धोक्यात आले आहेत. वन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

फवारणीची गरज

देवरी : पावसाचे आगमन होऊनही डासांचा जोर कमी झालेला नाही. अशात फवारणीची गरज आहे.

बायपासविना गावात दररोज वाहतुकीची कोंडी

केशोरी : येथून तालुक्याला जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून सर्वच लहान वाहनांपासून ते मोठ्या जड वाहनांसह सर्वच वाहने याच रस्त्याने जात असतात. त्यामुळे दररोज या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. अशा कठीणप्रसंगी प्रस्तावित असलेला बहुप्रतीक्षित बायपास रस्ता तयार होणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. येथील बायपास रस्ता निर्मिती अनेक वर्षांपासून रखडली आहे. या बायपास रस्ता निर्मितीची मागणी शासनदरबारी प्रलंबित आहे. वारंवार येथील स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देत असतात. मागील काही दिवसांपूर्वी आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी बायपास रस्ता निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिल्याचे सांगण्यात आले; परंतु अजूनही त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची वाटचाल दिसून येत नाही. यामुळे मात्र येथील बायपास रस्ता रखडल्याचे चिन्ह दिसत आहे. बायपास रस्ता निर्मितीचा हिरवा झेंडा केव्हा मिळतो, याची केशोरीवासीयांना प्रतीक्षा लागली आहे.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक-अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडचण होते.

रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडुपांमुळे वाहन दिसत नाही. झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

Web Title: Trampling the corona rules in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.