स्त्रियांच्या विविध आजारांवर ‘जीवनदायी’चा उतारा

By admin | Published: June 19, 2015 01:21 AM2015-06-19T01:21:59+5:302015-06-19T01:21:59+5:30

आजार लपवू नका. प्रारंभी अवस्थेतच रोगनिदान करून घ्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्या.

A transcript of 'life-giving' on various diseases of women | स्त्रियांच्या विविध आजारांवर ‘जीवनदायी’चा उतारा

स्त्रियांच्या विविध आजारांवर ‘जीवनदायी’चा उतारा

Next

लाभ घेण्याचे आवाहन : काटी येथे रोगनिदान व उपचार शिबिर
गोंदिया : आजार लपवू नका. प्रारंभी अवस्थेतच रोगनिदान करून घ्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्या. गर्भाशयाचे आॅपरेशन, सर्व प्रकारचे कर्करोग, विविध स्त्री रोग आजारांच्या शस्त्रक्रिया बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञांमार्फत मोफत करण्यात येतात. याचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी महिलांना केले.
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत बुधवारी (दि.१७) प्राथमिक आरोग्य केंद्र काटी येथे रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन बाई गंगाबाई रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. धाबेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद, आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका, गंगाबाईचे जीवनदायी योजनेचे कक्षप्रमुख भस्मे, विशाल टेंभुर्णे आदी उपस्थित होते. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रोगनिदान व मोफत उपचार शिबिराबाबत प्रास्ताविक प्राथमिक आरोग्य केंद्र काटीचे डॉ. अमित खोडनकर यांनी केले. स्त्री रोगतज्ञ डॉ. धाबेकर यांनी उपस्थित महिलांना स्त्रियांचे प्रदर रोग, स्तन कॅन्सरबाबत लक्षणे, निदान व उपचाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी महिलांना आवाहन केले की, चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने गर्भाशय व मुखाचे कॅन्सर होऊ नये म्हणून पॅप्स स्मेअर तपासणी करून घ्यावी. पॅप्स स्मेअरमुळे लवकर निदान होते व गुंतागुंत टळते येते.
यानंतर शिबिरात बालरोग तज्ज्ञांमार्फत १२६ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. ४७ गरोदर स्त्रिया व इतर ५४ स्त्रियांची विविध आजारांसाठी मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. गंभीर आजारी रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात हलविण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. अमित खोडतकर व प्राथमिक आरोग्य केंद्र काटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: A transcript of 'life-giving' on various diseases of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.