प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पुन्हा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:18 PM2019-02-25T22:18:59+5:302019-02-25T22:19:32+5:30

राज्यात मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काहूर माजले होते. त्यानंतर पुढील वर्षी बदल्यांच्या प्रक्रि येसंदर्भात काय होणार अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान यावर्षी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रि या सुध्दा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणार आहे.

Transfers of primary teachers online again | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पुन्हा आॅनलाईन

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पुन्हा आॅनलाईन

Next
ठळक मुद्देबदली झालेल्या शिक्षकांना तीन वर्षे स्थैर्य : गुरुजींचे अंमलबजावणीकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : राज्यात मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काहूर माजले होते. त्यानंतर पुढील वर्षी बदल्यांच्या प्रक्रि येसंदर्भात काय होणार अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान यावर्षी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रि या सुध्दा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणार आहे.
मागील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना पुढील तीन वर्षांसाठी बदलीस पात्र समजले जाणार नाही. म्हणजे २०२१ पर्यंत या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. तथापी यावर्षी शिक्षक बदली पात्र आहेत. त्यांना अर्ज सादर करता येतील. तसेच संवर्ग १ व २ यांनाही बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. तर शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत त्यांनाही अर्ज सादर करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत विचार सुरू आहे. दरम्यान, बदल्यांची प्रक्रि येची पूर्व तयारी सुरू झाली आहे. राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता ५ मार्च दरम्यान लागू शकते. निवडणुका एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता.त्यामुळे बदल्यांच्या नियमानुसार बदल्या ३१ मे पर्यंत करणे अनिवार्य आहे. ही कायद्यातील तरतूद लक्षात घेता राज्य शासन पूर्व तयारीचा भाग म्हणून माहिती संकेतस्थळावर भरण्याच्या दृष्टीने कार्यवाही करू करणार असल्याची माहिती आहे. यावर्षी अत्यंत कमी शिक्षक बदलीस पात्र झाले आहेत. ज्या शिक्षकांच्या सेवा दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शिक्षक आणि ज्या शिक्षकांची सेवा आदिवासी,
नक्षलग्रस्त क्षेत्रात तीन वर्षापेक्षा अधिक झाली आहे असे शिक्षक बदलीस पात्र आहेत. त्यामुळे मागील वर्षी सर्वाधिक बदल्या झाल्या असल्याने यावर्षी बदल्यांसाठी फार कमी शिक्षक पात्र असणार आहेत. त्यामुळे जे शिक्षक बदलीला पात्र आहेत, त्यांना अत्यंत कमी रिक्त जागा उपलब्ध होणार आहे.
मागील वर्षीच्या चुका यावर्षी टळणार
राज्यात मागील वर्षी प्रथमच ग्रामविकास मंत्रालयाने आॅनलाईन बदलीची प्रक्रि या केली होती. त्या प्रक्रि येत काही प्रमाणात चुकीची माहिती भरली आणि चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेणे अशा प्रकारच्या तक्र ारी पुढे आल्या होत्या. त्याप्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश मंत्रालयाने दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्थानिक पातळीवर संबंधितांना अवघड क्षेत्रात बदल्या करण्याचे सूचित करण्यात आले होते. काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रि या पूर्ण करण्यात आली काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता बदल्यांच्या प्रक्रि येपूर्वी ही प्रक्रि याही पूर्ण करण्यात येईल.
पती-पत्नी एकत्रीकरणातंर्गत बदल्या
संवर्ग १ व २ अंतर्गत ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर कार्यरत पती-पत्नीचे एकत्रीकरण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. मागील वर्षी यासंदर्भाने झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संवर्ग १ व संवर्ग २ साठी सेवेची अट नाही
संवर्ग १ व २ अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना बदलीपात्र ठरविण्यासाठी शासनाने सेवेची अट नाकारली आहे. या संवर्गातील शिक्षक सोयीनुसार बदलीकरिता कधीही अर्ज करू शकतात किंवा बदलास नकारही देण्याचे अधिकार त्यांना २१ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या शासन आदेशानुसार देण्यात आले आहे. यासंदर्भातील क्लिष्टता लवकरच स्पष्ट होणार असून त्याकडे सर्व गुरुजींचे लक्ष लागले आहे.
निलबंनाची कारवाई होणार रद्द
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना राज्य सरकारने चार प्रकारचे संवर्ग निर्माण केले आहे. यात विशेष संवर्ग १ व विशेष संवर्ग २ यात बदलीसाठी अर्ज करताना किमान दहा वर्ष ही अट शिथिल करण्यात आली आहे. या संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदल्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारे सेवेची अट नाही. तथापि संवर्ग २ मध्ये अर्ज करताना काही जिल्हा परिषदांनी दहा वर्षाची सेवेची अट गृहित धरून चुकीची माहिती सादर केली म्हणून शिक्षकांना निलंबित केले आहे. २१ फेबु्रवारीच्या शासन निर्णयानुसार संवर्ग १ व २ मध्ये सेवा लक्षात न घेता संबंधितांना अर्ज करता येणार आहेत. तथापि काही जिल्हा परिषदांनी संवर्ग १ व २ मधील कर्मचाऱ्यांची माहिती चुकीची भरली असे गृहीत धरून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे शासन निर्णयाने हे निलंबन रद्द ठरविले आहे.

Web Title: Transfers of primary teachers online again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.