लोकसहभागातून केला शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:17 AM2019-03-18T00:17:57+5:302019-03-18T00:18:18+5:30

संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथे बघावयास मिळत आहे. लोकसहभागातून येथील प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला असून प्राथमिक विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे.

Transformation of a school from public participation | लोकसहभागातून केला शाळेचा कायापालट

लोकसहभागातून केला शाळेचा कायापालट

Next
ठळक मुद्देहिरडामाली येथील शाळा : आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली प्राथमिक शाळा

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथे बघावयास मिळत आहे. लोकसहभागातून येथील प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला असून प्राथमिक विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे.
या शाळेतील मुख्याध्यापक ते शिक्षकांनी अथक परिश्रमातून या शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती केली आहे. शालेय परिसरातील सुसज्ज इमारत, आवारातील शंभर टक्के बोलक्या भिंती, स्मार्ट वर्ग, डिजीटल वर्ग, ज्ञान रचनावादी शिक्षण, कृतीयुक्त उपक्रम, शालेय परिसरातील चित्रीकरण या शाळेच्या जमेच्या बाजू असून म्हणूनच शाळेला प्राथमिक विभागातून जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवून दिला. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाशी सलग्नित होणारी जिल्ह्यातील दुसरी तर उच्च प्राथमिक गटातून पहिली शाळा हा या शाळेने मिळविलेला मान, अधोरेखीत करण्यासारखा आहे.
हिरडामाली हे गाव तसे साऱ्या महाराष्ट्रात नावाजलेले गाव. राजकारणात अखंड नाव कमावलेले हे गाव. शैक्षणिक क्षेत्रातही मोठी भरारी मारु शकेल असे कधी कुणाला वाटले नसावे. पण येथील तत्कालीन आणि कार्यरत शिक्षकांनी जी काही मेहनत घेतली त्याचे फळ आता या गावाला मिळणार आहे.
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल आहे. शाळेत लोकसहभागातून २३ टॅब, १२ संगणक, ५ प्रोजेक्टर, ३ एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. १ ते ७ वर्ग पर्यंतचे १९९ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. सर्वच विद्यार्थी डिजीटल शिक्षण प्रणालीचा फायदा घेत पटापट टॅबवर हात फिरवून उत्तरे देतात. या शाळेने ‘गावची शाळा-आमची शाळा’ उपक्रमात दोनदा तालुक्यातून प्रथम क्रमांक तर एकदा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला.
गुणवत्ता पूर्ण शाळा उपक्रमात जिल्ह्यातून द्वितीय तर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. साने गुरुजी स्वच्छ शाळा उपक्रमात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अलीकडेच गुणवत्त पूर्ण शाळा उपक्रमात जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान या शाळेला प्राप्त झाला.
या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक वाय.एस. भगत, तत्कालीन शिक्षक राहुल कळंबे, मुख्याध्यापक एस.डी. चन्ने, शिक्षक विरेंद्रकुमार पटले, एस. आर. बघेले, एन.आर. बिसेन, ए.ई. चाकाटे, सी.आर. पारधी, पी.सी. नंदेश्वर, एस.सी. पारधी, शाळा व्यवस्थापन समिती प्रा. लोकेश कटरे, गावकरी व पालकांच्या अथक आणि अखंड प्रयत्नांमुळे या शाळेचा कायापालट झाला आहे.

विद्यार्थ्यांची बचत बँक
या शाळेने बचत बँक उपक्रम सन २०१६ पासून राबविण्याचे काम हाती घेतले आहे. मुलांना बचतीचे फायदे सांगून बचतीचे धडे दिले. लहान बचत भविष्यात कशी फायद्याची आहे, हा मुलमंत्र मुलांनी जपला. आजघडीला या शालेय बचत बँकेत मुलांनी ८० हजार रुपये बचत केल्याचे तेथील शिक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Transformation of a school from public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा