प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: January 31, 2024 07:23 PM2024-01-31T19:23:52+5:302024-01-31T19:24:07+5:30

राजनांदगावकडून नवेगावबांधकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून त्या वाहनातून २ लाख २९ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला.

Transport of contraband tobacco, 2.29 lakh affected A case has been registered against both | प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल

गोंदिया: राजनांदगावकडून नवेगावबांधकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून त्या वाहनातून २ लाख २९ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कान्होली येथे ३० जानेवारी रोजी करण्यात आली. आरोपी दीपक दिलीप तेजराम कोडापे (३०) याने एम.एच. २७, ए.सी. ३५२४ या वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू तो विक्रीकरिता राजनांदगावकडून नवेगावबांधकडे आणत असताना कान्होलीजवळ त्याला अन्नसुरक्षा अधिकारी महेश प्रभाकर चहांदे (४३) यांनी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पकडले. या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलीप तेजराम कोडापे (४३) व महेश रमेश ठकरांनी, रा. हेमू कॉलनी चौक माता मंदिरजवळ गोंदिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुगंधी तंबाखू ईगलचे ३० पोत्यांमध्ये २९९ पॅकेट एक क्विंटल १९ किलो ६०० ग्रॅम किंमत एक लाख ९१ हजार ३६० रुपये, सुगंधित तंबाखू (व्ही वन) ४ पोत्यांमध्ये १९९ पॅकेट ५ किलो ९७० ग्रॅम किंमत ५ हजार ९७० ग्रॅम, राजश्री पान मसाला ४ पोत्यांमध्ये ९९ पॅकेट किंमत ११ हजार व एम. एच. २७, एसी ३५२४ मारुती अल्टो किंमत २० हजार या वाहनात तो तंबाखू ठेवून वाहतूक करीत असताना पकडण्यात आले. आरोपींवर नवेगावबांध पोलिसांत भादंविच्या कलम अन्नसुरक्षा व मानदे कायदा कलम २६) (२) (आय), २६ (२) (आय व्ही), २७ (३) (ई), ३ (१) (झेडझेड) (आयव्ही), ५९ सहकलम १८८, २७२, २७३, ३२८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दुनेदार करीत आहेत.

Web Title: Transport of contraband tobacco, 2.29 lakh affected A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.