२१९ शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:51 PM2019-08-06T23:51:03+5:302019-08-06T23:52:41+5:30

विद्यार्थ्यांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांना सुखरूप शाळेत व शाळेतून घरी सोडण्यात यावे यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. परंतु काही खासगी शाळा निव्वळ पैसा कमविण्याच्या नादात वाहतूक नियमांना धाब्यावर ठेवून भेटेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत व शाळेतून घरी ने-आण करण्यासाठी वापर करीत आहेत.

Transportation of students from 19 schools by private vehicles | २१९ शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनांनी

२१९ शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनांनी

Next
ठळक मुद्दे१३६५ शाळांमध्ये परिवहन समित्या : १४९ शाळा देतात स्वत:ची वाहतूक व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांना सुखरूप शाळेत व शाळेतून घरी सोडण्यात यावे यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. परंतु काही खासगी शाळा निव्वळ पैसा कमविण्याच्या नादात वाहतूक नियमांना धाब्यावर ठेवून भेटेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत व शाळेतून घरी ने-आण करण्यासाठी वापर करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात १६५७ शाळा आहेत. त्यापैकी १३६५ शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यापैकी फक्त १४९ शाळांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा शाळेच्या स्वत:च्या बसमधून देण्यात येते. तर २१९ शाळांधील विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून ने-आण केली जाते. ९३८ शाळांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा देण्याची गरज नाही. तालुकास्तरीय परिवहन समित्यांच्या ८५५ बैठका घेण्यात आल्या. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २०८ शाळांपैकी २१२ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली. यापैकी सहा शाळांची स्वत:ची वाहतूक सेवा आहे. सहा शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते तर तीन शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.
आमगाव तालुक्यातील १५४ शाळांपैकी १५४ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली. यापैकी १२ शाळांची स्वत:ची वाहतूक सेवा आहे. ३२ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असून ११० शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. देवरी तालुक्यातील २०८ शाळांपैकी २०८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी सहा शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून ४२ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १६० शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. गोंदिया तालुक्यातील ४१३ शाळांपैकी २०८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी ८७ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून ५३ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर २८२ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.
गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांपैकी १५८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी १४ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २२ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १२२ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. सालेकसा तालुक्यातील १४३ शाळांपैकी १४३ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी नऊ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २६ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १०८ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील १७१ शाळांपैकी ८० शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी आठ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून १७ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर सात शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. तसेच तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी २०२ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी सात शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २१ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १४६ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.

अनफिट बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक
चिमुकल्या विद्यार्थ्याना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे कडक निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसने फिटनेस सर्टीफिकेट न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे. परंतु त्यांच्यावर ना कारवाई ना दंड झाला. गोंदिया जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरून शाळेतपर्यंत व शाळेतून घरी सोडण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता ३९१ स्कूल बस विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी आहेत. यापैकी फक्त २२४ स्कूल बसेसचे फिटनेस ( योग्यता प्रमाणपत्र) झाले आहेत. परंतु १६७ स्कूल बसेसचे फिटनेस झालेच नाही.

Web Title: Transportation of students from 19 schools by private vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.