कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:38+5:302021-03-25T04:27:38+5:30
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे ...
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. ग्रामीण मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून ग्रामीणांची लूट केली जाते.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा त्रास होत आहे.
बाजारात वीज व्यवस्थेची मागणी
सइक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. तसेच येथील वॉर्ड क्रमांक ३ सर्व जनता याच मार्गावरती ये-जा करीत असतो.
तेंदूपत्त्याचे बोनस त्वरीत द्या
इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी गावाच्या मध्यभागातून रस्ता असल्याने येथे वर्दळ असून धोका वाढला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजुनही तयार झाला नाही.
शहरातील मजुरांच्या हाताला कामे केव्हा
अर्जुनी-मोरगाव : येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षात शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोची कामे मिळाली नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोंदिया : नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भर दिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनामुळे खेळाडूंचे भविष्य अंधारात
देवरी : शासनाने आदेश काढून बंदी हटवली आहे. मात्र याला क्रीडाक्षेत्र स्पर्धांसाठी तसेच मैदानावरील सरावासाठी अद्याप क्रीडा विभागाने कोणताही आदेश काढला नसल्याने खेळाडूंचे भविष्य अंधारात आहे.