वृक्ष माझा बंधू, त्याला राखी बांधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:08+5:302021-08-26T04:31:08+5:30
अर्जुनी मोरगाव : भारतीय संस्कृतीत बहीणभावाच्या अतूट प्रेमाचे नाते असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. वृक्षसुद्धा भावाप्रमाणे कार्य करीत पर्यावरणाचे संतुलन ...
अर्जुनी मोरगाव : भारतीय संस्कृतीत बहीणभावाच्या अतूट प्रेमाचे नाते असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. वृक्षसुद्धा भावाप्रमाणे कार्य करीत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत करीत असतात. ऑक्सिजन निर्माण करून मानवाचे प्राण वाचवतात. वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, या उद्देशाने वृक्षांना बंधू मानून सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेद्वारे वृक्ष माझा बंधू, त्याला राखी बांधू, हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी शालेय परिसरातील वृक्षांना संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिल मंत्री, जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, शिक्षक संजय बंगळे, राजेंद्र काकडे, कुंडलिक लोथे, संजय मोरे, माधुरी पिलारे, अर्चना गुरनुले यांच्या हस्ते विद्यार्थिनींनी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून आपल्या हस्त कौशल्याने बनविलेल्या राख्या बांधण्यात आल्या. हरित सेनेच्या फरहिंनाज पठाण, श्रुती तितरे, सुप्रिया बावनकुळे, सोनल नेवारे, तन्वी रुखमोडे, पलक राव या विद्यार्थिनींनी राख्या तयार केल्या. याप्रसंगी प्राचार्य अनिल मंत्री यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली. रक्षाबंधनानिमित्त विद्यालयात राखी मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीसाठी ऑनलाइन, तर वर्ग ८ ते १२ साठी राखी बनविण्याची ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट राख्यांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या उपक्रमासाठी सांस्कृतिकप्रमुख कुंडलिक लोथे, हरित सेनेचे प्रभारी शिवचरण राघोर्ते, प्रा. ओंकार लांजेवार, व प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षकांनी सहकार्य केले.