वृक्ष लागवडीचे होणार ‘आॅडिट’
By admin | Published: August 17, 2016 12:15 AM2016-08-17T00:15:58+5:302016-08-17T00:15:58+5:30
शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
८० टक्के रोपे जगवण्याची जबाबदारी : संगोपनासाठी अधिकाऱ्यांवरही भार
भंडारा : शासनाने राज्यात एकाचवेळी दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या रोपांपैकी ८० टक्के जगनलीच पाहिजेत, असे आदेश शासनाने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यंदा नुसती वृक्ष लागवड करून भागणार नाही तर लावललेली रोपे जिवंत आहेत, याची शहानिशा होणार आहे. त्यामुळे संगोपणासाठी अधिकाऱ्यांना आता मोठा आटापिटा करावा लागणार आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. शासनाच्या वतीने वृक्ष लागवड हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. परंतु लावण्यात आलेली किती रोपे जगली, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नसायचे. त्यामुळे राज्यातील वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पुढे आले. युती शासनाने यंदा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम चांगलाच मनवर घेतला. १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांना उद्दीष्ट दिले. वृक्ष लागवडीचा प्रचार, प्रसार करा, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय तथा शासनाचे इतरही विभाग, स्वयंसेवी संस्थांना वृक्ष लागवडीसाठी आणि त्याच्या संवधर्नासाठी प्रोत्साहित करा, असे आदेश शासनाने जिल्हा यंत्रणेला दिले होते. जिल्ह्याला लाखोंच्या घरात वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. ते पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. प्रत्येक शासकीय विभागाला उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यासाठी रोपांची व्यवस्था देखील केली गेली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयमसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक वनीकरण व वनविभाग यांनी एकत्रित येवून वृक्षलागवडीचे लोकचळवळीत रूपातर करीत १ जुलै या एकाच दिवशी जिल्ह्यात लाखो वृक्षांची लागवड केली. कृषी, महसूल, नगर परिषद, जलसंपदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीबरोबरच इतर शासकीय कार्यालयांनी देखील मोठ्या दिमाखात वृक्ष लागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने, जिल्हाभरात लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची नोंद केली आहे. काही दिवसानी या रोपाचे ‘आॅडिट’ होणार आहे. लावलेली ८० टक्के झाडे जगवण्याची जबाबदारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना धावपळ करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)