अतिक्रमण काढून वनविभागाने केले वृक्षारोपण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:39+5:302021-08-01T04:26:39+5:30
पांढरी : शेती करण्याच्या उद्देशातून झुडपी जंगलाच्या जागेवर अतिक्रमण करीत असलेल्यांना हिसका दाखवित वनविभागाने अतिक्रमण काढले असून त्या ७ ...
पांढरी : शेती करण्याच्या उद्देशातून झुडपी जंगलाच्या जागेवर अतिक्रमण करीत असलेल्यांना हिसका दाखवित वनविभागाने अतिक्रमण काढले असून त्या ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण केले आहे.
तालुक्यात जंगल नष्ट करून रात्रीच्या वेळेस अतिक्रमण केले आहे. रेंगेपार कक्ष क्रमांक ६६४ मध्ये शेती करण्याच्या उद्देशातून झुडपी जंगल कापून अतिक्रमण सुरू असल्याची गुप्त माहिती सडक-अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. पाचभाई यांना मिळाली होती. त्यांनी सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने ताफ्यासह घटनास्थळ गाठले व आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले. वनविभागाच्या माहितीप्रमाणे या अगोदर हरिचंद्र ब्राम्हणकर, कवडू मौजै, वासुदेव व विनोद डोंगरवार यांनी मोजे रेंगेपार कक्ष क्रमांक ६९८ मध्ये शेती करण्याचा प्रयत्न केला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हाकलून लावत त्या ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण केले. राजेश मेश्राम व राधेश्याम सलामे यांनी मौजे सतीटोला येथील कक्ष क्रमांक ६६२ मध्ये शेती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करून वृक्षारोपण करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी पाचभाई यांच्या मार्गदर्शनात रेंगेपारचे वनपाल संतोष धुगे, डोंगरगावचे वनपाल प्रधान, एन.डी.वाढई, सौंदडचे वनपाल मेंढे, कोसमतोंडीचे वनपाल वलथरे, वनरक्षक आनंद बंसोड, दीपक बोदलकर, महेश तिरपुडे, स्वप्नील डोंगरे, पवार, भोयर, विलास गौतम, आडे, चव्हाण, अगडे, साखरे, वनरक्षक वालोदे यांनी केली.