अतिक्रमणाच्या नावावर वृक्षतोड

By admin | Published: April 21, 2016 02:09 AM2016-04-21T02:09:44+5:302016-04-21T02:09:44+5:30

वनक्षेत्र सडक-अर्जुनी सहवनक्षेत्र शेंडा- कोयलारी बीट मधील संरक्षीत वनातील सर्वे कमांक १६५ मध्ये अतिक्रमण करून येन....

Tree trunk in the name of encroachment | अतिक्रमणाच्या नावावर वृक्षतोड

अतिक्रमणाच्या नावावर वृक्षतोड

Next

कोयलारी बीटमधील प्रकार : वन कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
सडक अर्जुनी : वनक्षेत्र सडक-अर्जुनी सहवनक्षेत्र शेंडा- कोयलारी बीट मधील संरक्षीत वनातील सर्वे कमांक १६५ मध्ये अतिक्रमण करून येन जातीची ५० झाडे अतिक्रमणधारकांनी जेसीबी चालवून तोडली. सुमारे दोन एकर जागेवरील झाडे जाळून टाकण्यात आली असून वन विभागाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त वन क्षेत्र सडक-अर्जुनी तालुक्यात असून हे वन क्षेत्र वन विभागाकडून सांभाळल्या जात नाही. यामुळेच काही अतिक्रमणधारकांकडून थोड्या पैशांत जंगलातील अतिक्रमण दाखवून आपल्यास विभागाशी बेईमानी करणाऱ्यांची संख्या वाढत गेली आहे. परिणआमी वन संपदा नष्ठ होण्याच्या मार्गावर आहे. अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी सहकार्य करणारे वन कर्मचारी तालुक्यात बरेच असून अशा कर्मचाऱ्यांची तक्रारही तहसील कार्यालयात करण्यात आली होती.
तरीसुद्धा आपल्या जंगलाचे संरक्षण करण्याऐवजी अतिक्रमणधारकांना मदत करणारे कोयलारी बीटाचे क्षेत्र सहायक रार्घोते व बीट रक्षक मोहतुरे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अतिक्रणधारकांना मदत केली असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. कोयलारी वनात प्लांटेशनला लागून असलेल्या जागेवर फार मोठी जुनी येणची झाडे जेसीबीने तोडण्यात आली. सुमारे दोन एकर जागा झाडो तोडून मोकळी करण्यात आल्याची ही फेब्रवारी महिन्यातील घटना आहे. गावकऱ्यांना लक्षात आल्याने त्यांनी क्षेत्रसहायक रार्घोते व बीट रक्षक मोहतुरे यांच्या लक्षात आणून दिले. तरिही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
हे लक्षात येताच गावकऱ्यांनी गोंदियात वनविभागात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत सहायक वन संरक्षक यु.टी. बिसेन यांनी मौका चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. यामुळे वन कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करून त्यांना डोंगरगाव डेपोत पाठविण्यास सांगीतले आहे. त्यामुळे आता वृक्षतोडीच्या या प्रकरणात क्षेत्रसहायक रार्घोते व बीट रक्षक मोहतुरे यांच्या कारवाई होते की, हे प्रकरण थंडबस्त्यात जाते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tree trunk in the name of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.