वृक्षांवर प्रेम करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:04 AM2018-07-02T00:04:08+5:302018-07-02T00:05:15+5:30
आई-वडिलांनी झाडं लावली, त्यात भर घालण्याऐवजी वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे. वृक्षलागवड ही आपली संस्कृती आहे. ती आई वडिलांची परंपरा आपण टिकवून ठेवली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : आई-वडिलांनी झाडं लावली, त्यात भर घालण्याऐवजी वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे. वृक्षलागवड ही आपली संस्कृती आहे. ती आई वडिलांची परंपरा आपण टिकवून ठेवली पाहिजे. मानवाला जिवंत राहण्यासाठी आॅक्सीजनची गरज असते. तो झाडांपासून मिळतो. प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्याच्या व्यवस्थेसाठी नैतिक जबाबदारी समजून परंपरा टिकविली तरच देश समृद्ध होईल, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
महाराष्टÑ शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत ग्राम खामखुरा येथे घेण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोहर चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल, किशोर तरोणे, मंदा कुंभरे, रचना गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.चे माजी सभापती उमाकांत ढेंगे, ग्राम वडेगावच्या सरपंच खुणे, ग्राम झरपडाच्या सरपंच कुंदा डोंगरवार, लोकपाल गहाणे, नगरसेविका गीता ब्राम्हणकर, पोलीस निरीक्षक एस.एस. कुंभरे, नाना शहारे, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्रविण बडगे, ग्राम खामखुराचे सरपंच अजय अंबादे, पं.स.च्या माजी उपसभापती आशा झिलपे, परिविक्षाधिन वनपरिक्षेत्राधिकारी पूनम पाटे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना चंद्रिकापुरे यांनी, एकजुटीने वृक्षलागवड केली पाहिजे. दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या नावे किमान १० झाडे लावली पाहिजे व त्यांच्या जोपासनेची जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे. आजची युवापिढी उद्याचे भवितव्य आहे. त्यांनी वृक्षलागवडीची धुरा सांभाळली पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामानाने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय औद्योगिकीकरण वाढल्यामुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. यावर वृक्षलागवड हाच उत्तम व एकमेव मार्ग आहे. त्यासाठी ही चळवळ म्हणून राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पूनम पाटे यांनी मानले. कार्यक्रमात एस.एस.जे. महाविद्यालयाचे एनएसएस पथक, जय दुर्गा हायस्कूल गौरनगर, तिबेटीयन सेटलमेंट, नवतरुण गणेश मंडळ खामखुरा, युवाशक्ती मंडळ खामखुरा, संपादन वडेगाव, गायत्री परिवार माहुरकुडा तसेच वडेगाव, इसापूर, इटखेडा, खामखुरा, कोरंभी, बुधेवाडा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे योगदान लाभले.
या मोहिमेंतर्गत अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील ग्राम खामखुरा येथे २२ हजार २२०, निमगाव येथे २२ हजार २२०, धाबेटेकडी (तिडका-६) येथे १६ हजार ६६५, निलज-तावशी येथे १५ हजार व धाबेटेकडी येथे पाच हजार ५५५ या प्रकारे एकूण ८१ हजार ६६० झाडांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रम पत्रिकेत गोंधळ
वनपरिक्षेत्र कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ दिसून आला. पहिल्या वृक्षलागवड कार्यक्रमात बोंडगावदेवी येथे माजी खा. नाना पटोले यांनी वृक्षमित्र करंडक पुरस्काराची घोषणा केली होती. या पत्रिकेत काही माजी पदाधिकाºयांची नावे समाविष्ट आहेत. मात्र पटोले यांच्या नावाचा उल्लेख नाही. याच पत्रिकेत सर्व जि.प. सदस्यांची नावे आहेत. मात्र जि.प. सदस्य तेजूकला गहाणे, किशोर तरोणे व सहा पं.स. सदस्यांची नावे नाहीत. तर स्व. नानाजी मेश्राम या मृत पं.स. सदस्यांचे नाव पत्रिकेत नमूद आहे. पत्रिकेतील या गोंधळाची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्र शासनाचा हा महाउपक्रम असतानाही यात विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती.