अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:39 AM2018-10-07T00:39:05+5:302018-10-07T00:39:59+5:30
अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ ठिकाणातून दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी (दि.५) करण्यात आलेल्या या कारवायांमुळे मात्र अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
या धाडसत्रांतर्गत, दवनीवाडा पोलिसांनी देवेंद्र सलाम (२२), जयराम लिल्हारे (३५), अशोक चिखलोंडे (३५,सर्व रा. लोधीटोला) व सुरेश दगडे (४५,रा. धापेवाडा) या चार जणांकडून हातभट्टीची १६० लीटर दारू, १७ हजार ६६० रूपये रोख व मोटारसायकल असा एकूण ८३ हजार ६६० रूपयांचा माल जप्त केला.
शहर पोलिसांनी गौतमनगरातील कालू उर्फ बुधराम कांबळे (५०) याच्याकडून देशी दारूच्या १६ बॉटल्स, मोहफुलाची ४ लीटर दारू असा एकूण १ हजार ३६० रूपयांचा माल जप्त केला.
गंगाझरी पोलिसांनी ग्राम लेंडेझरी येथील हेतराम सलाम (४५) याच्याकडून मोहफुलाची १५० लीटर दारू, ४५० किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ४२ हजार ८०० रूपयांचा माल जप्त केला. विशेष पथकाने डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सचिन बिलोने (३१), खुशाल मडावी (३१,दोन्ही रा. सौंदड) यांच्याकडून मोफुलाची २५ लीटर दारू, ८५ किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ५६ हजार १०० रूपयांचा माल जप्त केला. ग्रामीण पोलिसांनी बैरागीटोला येथील पामेश्वर पंधरे (२५) याच्याकडून हातभट्टीची १५ लीटर दारू, २२५ किलो मोहफुल तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १४ हजार २० रूपयांचा माल जप्त केला.
रावणवाडी पोलिसांनी ग्राम कामठाटोली येथील सुनिता मस्करे (४६) हिच्याकडून १५० किलो मोहफुल व हातभट्टीची १० लीटर दारू असा १० हजार ५०० रूपयांचा माल जप्त केला. तर डुग्गीपार पोलिसांनी ग्राम डव्वा येथील चुन्नीलाल साखरे (६८) याच्याकडून विदेशी दारूच्या ३८ बॉटल्स व देशी दारूच्या ५२ बॉटल्स असा एकूण १० हजार ७४ रूपयांचा माल जप्त केला. आरोपींविरूद्ध महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.