आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:13+5:302021-06-03T04:21:13+5:30

सडक-अर्जुनी : आदिवासी विकास महामंडळाने रब्बी हंगामातील धान खरेदीला तालुक्यातील एकाही केंद्रावरून अद्यापही सुरुवात केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक ...

Tribal Development Corporation should start purchasing paddy | आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी सुरू करावी

आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी सुरू करावी

Next

सडक-अर्जुनी : आदिवासी विकास महामंडळाने रब्बी हंगामातील धान खरेदीला तालुक्यातील एकाही केंद्रावरून अद्यापही सुरुवात केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्वरित धान खरेदी सुरू करावी; अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. अजय लांजेवार यांनी दिला आहे.

सडक-अर्जुनी येथे शंभर ते दोनशे शेतकऱ्यांसह सडक-अर्जुनी येथील धान खरेदी केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली असता व धान खरेदी केंद्राला विलंब का लागत आहे, याबाबत धान खरेदी केंद्राचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तेव्हा आमच्याकडे धान्य ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आम्ही धान खरेदी करू शकत नाही व तसेच आदिवासी महामंडळाने आम्हाला अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. आम्ही अनेकदा पत्रव्यवहार करूनसुद्धा आदिवासी महामंडळाचे राठोड यांच्याशी प्रत्यक्ष पत्रव्यवहार व भेटून, वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी कुठलेच सहकार्य केले नाही. त्यामुळे धान खरेदीला सुरुवात केली नसल्याचे खेडकर व राजगिरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. सडक-अर्जुनी तालुक्यातील राईस मिलर्सला नवेगाव बांध, केशोरी, गोठणगाव येथून धानाची उचल करायची आहे; परंतु जवळच्या केंद्रावरील धानाची उचल करण्याचे आदेश न मिळाल्याने खरेदीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत यावर तोडगा न काढल्यास याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अजय लांजेवार यांनी दिला आहे.

Web Title: Tribal Development Corporation should start purchasing paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.