आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी कायम ठेवला मतदानावरील बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:49 PM2024-11-11T16:49:50+5:302024-11-11T16:51:15+5:30

८५ वर्षांवरील व दिव्यांग मतदारांनी मतदान नाकारले : इतर ७४ मतदारांनी केले मतदान

Tribal Gond Gowari community members continued their boycott of voting | आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी कायम ठेवला मतदानावरील बहिष्कार

Tribal Gond Gowari community members continued their boycott of voting

लोकमत न्यूज नेटवर्क 
अर्जुनी-मोरगाव :
विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांचा शनिवारी (दि.९) गृह मतदान घेण्यात आले. यात मतदारसंघातील आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. तर २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत आदिवासी गोंड गोवारी समाज पूर्णतः मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे बोलल्या जाते.


८५ वर्षांवरील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सहज शक्य होण्यासाठी निवडणूक विभागाने गृह मतदानाची व्यवस्था केली होती. मतदान करण्यासाठी त्यांचेकडून पूर्वीच अर्ज मागवून नाव नोंदणी करण्यात आली. 


अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील वयोवृद्ध ७० मतदार व दिव्यांग १० मतदार असे ८० मतदारांनी घरूनच मतदान करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यानुसार शनिवारी ८० मतदारांचे गृह मतदान घेण्यासाठी दहा निवडणूक पथकांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. विधानसभा क्षेत्रात गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. नोंदणी केलेल्या ८५ वर्षांवरील ६६ मतदार व दिव्यांग ८ मतदार असे एकूण ७४ मतदारांनी भरूनच मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. 


५ मतदारांचा बहिष्कार
राज्यातील आदिवासी गोंड गोवारी समाज संघटनेने विधानसभा निवडणु- कीवर बहिष्कार यांची घोषणा यापूर्वीच केली होती. समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान करणार नाही अशी घोषणा केली होती. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ४ मतदार तसेच दिव्यांग म्हणून एक मतदार असे आदिवासी गोंड गोवारी समाजातील ५ मतदारांनी मतदान करण्यास स्पष्ट नकार देऊन मतदा- नावरील बहिष्कार कायम ठेवला.

Web Title: Tribal Gond Gowari community members continued their boycott of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.