सलंगटोला येथील आदिवासींना रस्ताच नाही
By admin | Published: June 29, 2014 11:58 PM2014-06-29T23:58:19+5:302014-06-29T23:58:19+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत
शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील उशीखेडा येथून अडीच किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला या आदिवासी गावाला येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे या आदिवासीसोबत प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रत्येक छोट्या मोठ्या गावांना पक्के रस्ते तयार केले जाते. परंतु सलंगटोला या आदिवासी गावाला कुठल्याही मार्गाने जोडल्या गेले नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दल्ली किंवा उशिखेडा येथील शाळेत जाणे कठीण झाले आहे.
या गावातील लोक व विद्यार्थी शेतातील धुऱ्याने येणे-जाणे करतात. पावसाळाच्या दिवसात तर धुऱ्याने जाणे सुध्दा कठीण होते. याबाबत दल्ली ग्राम पंचायतला वारंवार मागणी करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी अथवा कोणताही अधिकारी या गावाकडे ढुकूंनही पाहीले नाही, असा येथील लोकांना आरोप आहे.
देशात आदिवासींना सर्वांगिण विकासासाठी वेगळा आदिवासी विकास विभाग असूनही आदिवासी गावाकडे दुर्लक्ष केला जातो, ही शोकांतिका आहे. या गावाकडे दुर्लक्ष केला गेल्याने त्यांचा विकास होण्याऐवजी विकास खुंटेला आहे. उशिखेडा, टेकरी ते सलंगटोला असा मार्ग तयार झाला, तर विद्यार्थी शाळेत जाणे पसंत करतील. अन्यथा विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहावे लागेल.
निवडणूक काळात विविध पक्षांचे कार्यकर्ते धुऱ्या पाळीने जाऊन मतासाठी या गावाला भेट दिली. रस्त्याची समस्या नक्कीच दूर करू असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक संपली की, ढुकूंनही पाहत नाही, अशी व्यथा सुज्ञ नागरिकांनी मांडली आहे. स्वातंत्र्याची ६० वर्ष लोटले. मात्र सलंगटोलाला रस्ता नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. (वार्ताहर)