उंच फाटकामुळे जनता अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:27 AM2018-06-01T00:27:42+5:302018-06-01T00:27:42+5:30

Trouble in the public due to high stakes | उंच फाटकामुळे जनता अडचणीत

उंच फाटकामुळे जनता अडचणीत

Next
ठळक मुद्देरिसामा फाटकावरील प्रकार : भुयारी पुलाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला असून त्वरीत भुयारी पुलाची मागणी केली आहे.
रेल्वे फाटकापलीकडे रिसामा ग्रामस्थांची जवळपास ४०० एकर शेती आहे. बाराही महिने याच रेल्वे फाटकावरुन जनतेला आवागमन करावे लागते. प्रामुख्याने शेतकºयांचे ट्रॅक्टर व बैलगाड्यांची सारखी वर्दळ असते. फाटक बंद असल्यास बराच वेळ बैलगाड्या व ट्रक्टरला गाडी जातपर्यंत वाट बघावी लागते.
कधीतर दोन गाड्यांच्या आवागनामुळे बराच वेळ थांबावे लागते. अशात बैलगाडी असल्यास अधिकच धोक्याचे असते. रेल्वेचा परिसर उंच असल्याने उभी असलेली बैलगाडी मागे जाते. अशा घटना या रेल्वे फाटकावर घडल्या आहेत.
त्यामुळे रेल्व फाटकाला लागून चौकीच्या शेजारी भुयारी पूल अत्यंत गरजेचे आहे. भुयारी पुल असल्यास शेतकºयांनाही कोणतीच भिती राहणार नाही. मध्यतंरी भुयारी पुलाकरिता सेवानिवृत्त प्राचार्य शामराव बहेकार यांनी अधिकाºयांशी चर्चा करुन समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
परंतु केवळ आश्वासन मिळाले. निधी मंजूर झाला, मात्र अधिकारी बदलले. नवीन अधिकारी आल्याने फक्त कागदांची हालचाल होत आहे. त्यामुळे आता कामाला वाढीव निधी लागेल. मात्र ठोस आश्वासन किंवा भुयारी पुलाचे काम होण्याचे चिन्ह दिसत नाही.

Web Title: Trouble in the public due to high stakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे