शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:36 PM2019-02-17T22:36:11+5:302019-02-17T22:36:53+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
शिक्षक समितीचे मार्गदर्शक एस.जे.जोगी यांच्या नेतृत्वात प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती अर्चना राऊत होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.एल.मेश्राम, शिक्षण विभागाचे अधीक्षक एस.आर.वंजारी व सर्व लिपीक उपस्थित होते.
बैठकीत, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करुन पगार काढण्यात यावे याविषयावर चर्चा करण्यात आली. यावर सध्या जिल्हास्तरावरुन कोणतेही आदेश नसल्यामुळे लांबणीवर असल्याचे गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी सांगीतले. मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे जीपीएफ व डीसीपीएफचे चालान व शेड्युल जिल्हा परिषदेला पाठविणे, चटोपाध्याय व एकस्तरचे प्रकरण जि.प.पाठविणे, एसजीएसपीचे लाभ घेण्यासाठी माहे मार्च २०१९ पासून शिक्षणाचे पगार एसबीआय शाखा आमगावातून करणे, २ व १४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव जि.प.लापाठविणे, प्रत्येक महिन्याच्या पगाराचे वाऊचर क्रमांक प्रत्येक शाळेला पुरविणे, नक्षल भत्तामध्ये पाचवा वेतन आयोगानुसार निश्चिती करुन माहे एप्रिलच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, चुकीची वेतन निश्चिती करुन सेवा पुस्तिकेची पाने खराब करणाऱ्या लिपीकांना ताकीद देण्यात यावी, पानगाव शाळेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात यावा, भारतीय जीवन बिमाचे २००९ ते २०१४ पर्यंत शिक्षकांच्या वेतनातून कपात व पाठविलेल्या शेड्युल यामध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी विशेष कॅम्प मार्चमध्ये लावण्यात यावे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.
सर्व प्रलंबीत समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सभापती राऊत व गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. संचालन डी.एस.कुराहे यांनी केले. आभार जयेश लिल्हारे यांनी मानले. बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सतीश दमाहे, सरचिटचणीस जी.सी.बघेले, कार्याध्यक्ष टी.आर.लिल्हारे, प्रसिध्दीप्रमुख आर.एस.बसोने, ए.बी.बोरकर, पी.एम.फरकुंडे, जयेश लिल्हारे, आर.के.बोरकर, कोसरकर, एस.बी.खोब्रागडे, पी.एम.ढेकवार उपस्थित होते.