सौंदडमध्ये ट्रामा केअर सेंटरसाठी प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:53 AM2017-02-16T00:53:32+5:302017-02-16T00:53:32+5:30
सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी
पालकमंत्री बडोले : घटेगाव येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमीपूजन
\सौंदड : सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तसेच घटेगाव व परिसरातील गावातील विविध समस्या सोडविल्या जात असल्याची माहिती पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
सडक/अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे १२ फेब्रुवारी रोजी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.वाय. ब्राम्हणकर, घटेगावच्या सरपंच रेखा कोसलकर, उपसरपंच कांता गायधने, पोलीस पाटील कुंदा नेवारे, प्रतिष्ठीत नागरिक विष्णुजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी डॉक्टर गावात उपलब्ध नसल्यामुळे लोक वैदू, मरीमायच्या मागे लागायचे. आता लोकांचा शिक्षणावर भर असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुधारणा झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती उभारुन आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करु न देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन तर भिवखिडकीच्या आरोग्य केंद्राचे कोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभापती रंगारी म्हणाल्या, पूर्वी घटेगाव परिसरातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते. आता या उपकेंद्र इमारतीच्या बांधकामामुळे आरोग्यविषयक सुविधा इथेच मिळण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचेच असल्यामुळे अनेक कामे त्यांनी मंजूर केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्यासाठी त्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी असेही त्यांनी सांगितले. श्रीमती चव्हाण म्हणाल्या, घटेगावसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत होणे ही आनंदाची बाब आहे. घटेगाव हे अनेक समस्यांनी ग्रस्त गाव आहे. पूर्वी या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत होते. पालकमंत्र्यांनी या भागाकडे लक्ष दिल्यामुळे विकासाला गती मिळाली आहे असे त्या म्हणाल्या. सरपंच श्रीमती कोसलकर म्हणाल्या, आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी आल्यात. गावात बसची सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याची अडचणी आहे. ग्रामपंचायतीची इमारत नादुरु स्त आहे. या समस्या पालकमंत्री निश्चित सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्र माला डॉ.गुंड व आरोग्य विभाग कर्मचारी तसेच घटेगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उरकुडे यांनी मानले. (वार्ताहर)