चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:11 PM2017-10-02T22:11:27+5:302017-10-02T22:11:48+5:30
दसºयाचा सण सत्कार्याच्या विजयाचे प्रतीक असून श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदया : दसºयाचा सण सत्कार्याच्या विजयाचे प्रतीक असून श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला होता. याच प्रकारे आम्ही आपल्यातील अवगुणांना नष्ट करून चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा युवक कॉंग्रेस व दसरा उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने येथील सर्कस मैदानमध्ये आयोजीत रावणदहन कार्यक्रमात ते बोलत होते. रावणदहनच्या कार्यक्रमात भव्य आतषबाजी, रामलीला व रामदरबारचा देखावा, संगीत व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
सर्वप्रथम आमदार अग्रवाल यांच्या हस्ते रामचंद्र व हनुमानाची पूजा करण्यात आली व त्यांनतर बाण चालवून रावणदहन करण्यात आले.
संचालन व आभार महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला उमा गोपालदास अग्रवाल, गोंदिया-भंडारा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल अग्रवाल, राकेश ठाकूर, भागवत मेश्राम, क्रांती जायस्वाल, व्यंकट पाथरू, देवा रूसे, विमल नागपूरे, शेखर पटेल, सिमा मडावी, अर्जुन नागपूरे, जगदीश मिश्रा, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, राकेश जायस्वाल, सुशील शर्मा, राजू तिवारी, देवेंद्र अग्रवाल, मनिष अग्रवाल, दीपल अग्रवाल, दीपक मालगुजार, छाया मेश्राम, मनजीतसिंग गुलाटी, राजेश चौरसिया यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.