महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:50 PM2018-02-15T23:50:34+5:302018-02-15T23:50:58+5:30
वामा महिला सुरक्षा दलाने महिलांच्या अधिकारांची लढाई लढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षेत्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वामा महिला सुरक्षा दलाने महिलांच्या अधिकारांची लढाई लढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षेत्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी शासकीय स्तरावर संभव सहकार्य करण्याची आमची भूमिका राहणार असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील वामा महिला सुरक्षा दलच्यावतीने आयोजीत सहाव्या वार्षिकोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाला बालाघाट नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धुवारे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, समाजातील अनेक कुरीतींचे निर्मुलन व समाज सुधारणेसारखे रचनात्मक कार्यक्रम आयोजीत करून या संस्थेने आपल्या उद्देशांप्रती सजगता दाखविली आहे. यामुळेच मागील काही वर्षांत क्षेत्रातील महिलांमध्ये संस्थेप्रती विश्वास कायम झाल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम, नगर परिषद सभापती भावना कदम, नगरसेविका शिलू ठाकूर, मौसमी परिहार, महिला-बाल कल्याण अधिकारी सुजाता देशमुख, रूपाली सोयाम, ग्रामीणचे ठाणेदार दिनेश शुक्ला, राधिका कोकाटे, रजनी तुमसरे, मंजू कटरे, भावना अग्रवाल, अॅड. सुजाता तिवारी, डॉ. रिना रोकडे व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वामाच्या संगीता घोष, पुजा तिवारी, माधवी चुटेलकर, संगीता माटे, रिता चव्हाण, सुरभी जैन, सुषमा यदुवंशी, सानू बांडेबुचे, मेघा बोपचे, उन्नती बांडेबुचे, दिपाली राणे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहकार्य केले.
महिला सुरक्षा व जनजागृतीपर कार्यक्रम
या कार्यक्रमात महिला पोलीस विभागाच्यावतीने निर्भया पथक महिला सक्षमीकरण प्रात्यक्षिक, निर्भया बेटी सुरक्षा अभियान, महिला बाल संगोपन, विद्यांजली शिक्षा सहसंस्कार, महिला आत्मसुरक्षा, छेडखानीच्या घटनांचा प्रतिकार करण्याच्या प्रकारांचे प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय शौचालयांचा उपयोग, महिला आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण सुरक्षा, वृक्षारोपण, पाणी वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, भ्रूण हत्या, हुंडा निर्मुलन आदि विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.