ज्युदोचा नावलौकिक वाढविण्याचे प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:18 PM2017-09-28T21:18:25+5:302017-09-28T21:18:37+5:30

ज्युदो हा क्र ीडा प्रकार मूळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान त्यानंतर अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतून परत भारतात आला. असा या खेळाचा प्रवास आहे. हा खेळ मुळात भारतीय असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून, .....

Try to promote Judo's reputation | ज्युदोचा नावलौकिक वाढविण्याचे प्रयत्न करा

ज्युदोचा नावलौकिक वाढविण्याचे प्रयत्न करा

Next
ठळक मुद्देदिलीप पाटील-भुजबळ : राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धेचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ज्युदो हा क्र ीडा प्रकार मूळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान त्यानंतर अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतून परत भारतात आला. असा या खेळाचा प्रवास आहे. हा खेळ मुळात भारतीय असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून, या खेळाचे नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
बुधवार (दि.२७) जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोअर स्टेडियम येथे अमॅच्युर ज्युदो असोसिएशन गोंदिया व महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ४५ वी राज्यस्तरीय सब ज्युनियर मुले-मुली ज्युदो स्पर्धेचे उदघाटन डॉ. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे सचिव दत्ता आफळे, उपाध्यक्ष राजकुमार पुंडकर, सहसचिव डॉ. गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रवी मेटकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मनोहर बनगे,अ‍ॅड. सुधीर कोंडे, नरिसंग यादव, पुरूषोत्तम चौधरी, जिल्हा अमॅच्युर असोसिएशनचे अध्यक्ष अजितसिंह गौर, संयोजक अपूर्व अग्रवाल, सचिव राजेश गायधने उपस्थित होते.
डॉ. भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस प्रशिक्षणात ज्युदो क्रीडा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. आत्मसंरक्षणासाठी ज्युदोची भूमिका महत्वाची आहे. गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असूनसुध्दा या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेच्या आयोजनामुळे गोंदियाचा नावलौकीक वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे रक्षण करण्यासाठी मुलींनी ज्युदोचे चांगले प्रशिक्षण घेऊन दुर्गेच्या अवतारातून पुढे आले पाहिजे. राज्य किंवा राष्ट्रीयस्तरावर या स्पर्धेत सहभागी असल्याचे प्रमाणपत्र असल्यास खेळाडूला नोकर भरती प्रक्रियेत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आफळे म्हणाले, ज्युदो खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. ज्युदोच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या मातीत खेळावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. राज्याची खेळाची परंपरा ही उज्ज्वल आहे.
या खेळाच्या वाढीसाठी समाजातील अनेक घटक आज पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ज्यांनी या खेळात खेळाडू म्हणून सुरूवात केली ते पुढे जावून आंतरराष्ट्रीय पंचापर्यंत पोहोचले, असे त्यांनी सांगितले.
अग्रवाल म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने आतापर्यंत सर्वात जास्त ज्युदो खेळाडू गोंदिया येथील स्पर्धेत सहभागी झाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेत जे खेळाडू यशस्वी होतील ते देशपातळीवर राज्याचा नावलौकीक करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी ज्युदो खेळासाठी योगदान देणारे पुणे येथील अ‍ॅड. सुधीर कोंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन डॉ. भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक मुले-मुली, पंच व मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत चारशेवर स्पर्धकांचा सहभाग
या स्पर्धेत मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील २७७ मुले व १७३ मुली सहभागी झाल्या आहेत. यामधूनच सन २०१७-१८ ची राष्ट्रीय निवड चाचणीसुध्दा या स्पर्धेतूनच होणार आहे.

Web Title: Try to promote Judo's reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.