विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगले मुल्य रूजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:10+5:302021-07-07T04:36:10+5:30

तिरोडा : शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगले आरोग्य आणि चांगली मूल्ये रूजविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या ...

Trying to inculcate good values in students with good education | विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगले मुल्य रूजविण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगले मुल्य रूजविण्याचा प्रयत्न

Next

तिरोडा : शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगले आरोग्य आणि चांगली मूल्ये रूजविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या माध्यमातून तिरोडासारख्या छोट्या शहरात आम्ही महानगरांच्या बरोबरीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे घर, जसे मुले आपले घर कधीच विसरत नाहीत, त्याचप्रमाणे ते आपली शाळादेखील विसरत नाहीत. कारण त्यात काही आंबट - गोड आठवणी जुळलेल्या असतात, असे प्रतिपादन शाळेचे संचालक मुकेश अग्रवाल यांनी केले.

मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये १०वा वर्धापन दिन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन निबंध, चित्रकला आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देवी सरस्वतीच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल उर्मिला दीदी यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य तुषार येरपुडे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयकुमार परिहार व सोनाली यांनी केले. सतीश बिसेन यांनी आभार मानले.

050721\584020210705_221752.jpg

सत्कार करताना मुकेश अग्रवाल

Web Title: Trying to inculcate good values in students with good education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.