इर्रीला आदर्श ग्राम बनविण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 08:55 PM2018-04-28T20:55:04+5:302018-04-28T20:55:04+5:30
ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम बनविण्यासाठी सहकार्य करा.....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम बनविण्यासाठी सहकार्य करा असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ग्राम ईर्री येथे आवश्यक कामांची माहिती देण्यासाठी आयोजीत विशेष आमसभेत ते बोलत होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी गावच्या विकासासाठी काही सूचना दिल्या. त्यात, गावात हायमास्ट लाईट व चौकांचे सौंदर्यीकरण, गाव तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण, कोलासूर बाबा मंदिर परिसरात पेयजल सभागृह व रस्ता, गावात सार्वजनिक शौचालय, नवीन ग्रामपंचायत भवन, अतिरिक्त पथदिवे, पाणी पुरवठा योजनेजवळ बंधारा बांधकाम, जिल्हा परिषद शाळेला सुरक्षाभिंत, गावात वाचनालय व व्यायामशाळा, प्रत्येक घर व गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम, आरोग्य उपकेंद्राची स्थापना, पशु वैद्यकीय दवाखान्याची स्थापना, जिल्हा परिषद डिजीटल करणे यासह अन्य सूचनांचा समावेश आहे.
प्रास्तावीकात पंचायत समिती खंड विकास अधिकारी वांझडे यांनी, शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने गावाला मिळणार असल्याचे सांगीतले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचातय समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, हरिचंद कावळे, चमन बिसेन, बंटी भेलावे, दुर्गा मेंढे, रवी तरोणे, प्राणता ढेकवार, अजवंती उपवंशी, उर्मिला उपवंशी, दुर्गा ठकरेले, गिता नागपुरे, सखाराम मडावी, अशोक चव्हाण, कैलाश चौधरी, रमेश चौधरी, मुलचंद चौधरी, मिथून पटेल, कमल ठकरेले, बेनीराम महारवाडे, सुखदेव राखडे, मगनलाल ढेकवार, नामदेव वैद्य, भाऊलाल तरोणे, नारायण ठकरेले, भाऊराम लिल्हारे, श्यामलाल उपवंशी, चैनलाल दमाहे, सहेसराम उपवंशी, पैकू पाथोडे, रमेश मेंढे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.