समाजोपयोगी उपक्रमांमुळे तंमुसला आली बळकटी
By admin | Published: February 6, 2017 12:47 AM2017-02-06T00:47:28+5:302017-02-06T00:47:28+5:30
जेष्ठांना सन्मान, वाचनालयांचे उत्थान, कुपोणावर मात, हुंडाबंदीसाठी प्रयत्न, गावाचे विद्रुपीकरणासाठी पुढाकार, आंतरजातिय विवाहाला प्रोत्साहन,
तंटे सुटले सामोपचाराने : जातीय दंगलींना बसला आळा
गोंदिया : जेष्ठांना सन्मान, वाचनालयांचे उत्थान, कुपोणावर मात, हुंडाबंदीसाठी प्रयत्न, गावाचे विद्रुपीकरणासाठी पुढाकार, आंतरजातिय विवाहाला प्रोत्साहन, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व क्रूर चालीरितींंचे उच्चाटण, थोर महापुरूषांच्या पुतळ्यांचे जतन, गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना, दारूबंदीवर आळा घालण्यासाठी तंटामुक्त मोहीमेने प्रयत्न केले. समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे तंटामुक्त मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला आहे.
ज्या गावात अंतर्गत कलह होता तो संपुष्टात आला. जातीय दंगलीवर नियंत्रण आणण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्वातून ही मोहीम गाजविली. आज राज्यातील प्रत्येक नागरिकाला तंटामुक्तही तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्त मोहीम महत्वाची कामगिरी बजावत आहे. गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहीमेमुळे राज्यातील २० लाखावरील तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेमुळे शासनाच्या कामात मदत करण्यासाठी गावगावात लोकचळवळ उभी झाली. राज्यातील तंटामुक्त गावे होण्याची प्रतिक्षा राज्यातील ८ हजार गावांना आहे. राज्यातील २७ हजार ग्राम पंचायतीपैकी १८ हजार ४२३ गावे साात वर्षात तंटामुक्त झालीत. सहा वर्षाच्या काळात राज्यातील चार जिल्हे तंटामुक्त झाले आहेत. यात गोंदिया जिल्हा राज्यातून तंटामुक्त होणारा जिल्हा आहे. गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर स्वरूपाचे तंटे सोडवून नविन तंटे उद्भवणार नाही. याकडे लक्ष घालून समित्यांनी आपल्या गावाला शांततेतून समृध्दीकडे नेण्याचा माणस बांधला. अदखल स्वरूपाचे व काही फौजदारी प्रकरणेही तमुसने हाताळून गावात नवीन आदर्श उभा केला. (तालुका प्रतिनिधी)