जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:57 AM2018-08-01T00:57:53+5:302018-08-01T00:58:50+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला.
Next
ठळक मुद्देसां.बा.विभाग लागला कामाला : जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठक
लोकमत
न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) अधिसूचना काढून मंगळवारपासून (दि.३१) उड्डाणपूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. मुंबई येथे रेल्वेचा जुना पूल कोसळल्यानंतर रेल्वे विभाग कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने तडाकफडकी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवून जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले. हे पत्र जिल्हाधिकाºयांच्या हातात पडताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेवून यावर उपाय योजना काढण्यासाठी मार्गदर्शन मागविले.
त्यात शहरात येणारी सर्व जड वाहतूक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. तसेच शहरवासीयांना त्रास सहन करावा लागले. त्यामुळे जुना उड्डाणपूल पायी जाण्यासाठी व हलक्या वाहनासाठी सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. त्यानंतर प्रशासनाने अग्रवाल यांच्या मागणीनुसार या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) सांयकाळी जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना काढली.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठक
जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीत जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर तोडगा काढण्यात येणार आहे. या पुलाच्या स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल आल्यानंतर पूल पाडायचा की नाही व वाहतूक कोणत्या मार्गे वळवायची यावर या बैठकीत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रेल्वे विभागाकडून वाढला दबाब
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलासंदर्भात रेल्वे विभाग कुठलीही जोखीम पत्कारण्यास तयार नाही. मुंबई येथील घटनेनंतर रेल्वे प्रशासन सुद्धा कोमात आहे. अशात जुन्या उड्डाणपुलावरुन एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे.
नवीन पुलाची करणार दुरूस्ती
दोन वर्षापूर्वी गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. मात्र नवीन उड्डाणपुलाच्या दोन्हीे बाजुला पायी जाणाºया नागरिकांसाठी पादचारी पूल तयार करण्यात आला नाही.त्यामुळे हा पूल सदोष पूर्ण असून यात सुद्धा दुरूस्ती करण्याची गरज असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला असल्याची माहिती आहे.