विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 09:52 PM2017-10-23T21:52:30+5:302017-10-23T21:52:46+5:30

शहरातील विविध चौकांचे सौंदर्यीकरण करुन शहराच्या चेहरा मोहरा बदलवून एक नवीन ओळख निर्माण करुन देण्यासाठी, येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

Turned on the hard work of the students | विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी

विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देसौंदर्यीकरणाची दुरवस्था : सर्वत्र केरकचºयाचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील विविध चौकांचे सौंदर्यीकरण करुन शहराच्या चेहरा मोहरा बदलवून एक नवीन ओळख निर्माण करुन देण्यासाठी, येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. मात्र काही असामाजिक तत्वांकडून या सौंदयीकरणाचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे चित्र आहे.
शिक्षणामुळे विचारांचे परिवर्तन होत असते. नवीन गोष्टींना चालना देण्यास मदत होते, तसेच एका चांगल्या समाजाची निर्मिती करणे सुध्दा शक्य होते. विद्यार्थ्यांमध्ये देश घडविण्याची क्षमता असते असे म्हटले जाते. गोंदिया शहरात विविध चौकात थोर पुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या परिसराची साफसफाई व सौंदयीकरण करण्याचा संकल्प येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला.
यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील नेहरु चौक, बजाज चौक, कालेखा कंपनी चौक आणि मोक्षधाम परिसराची निवड केली. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरूवातीला सर्वेक्षण केले. रस्त्यांचे मोजमाप केले. त्यानंतर प्रत्येक्षात कामाला सुरूवात केली.
नेहरु पुतळ्याच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करुन त्या परिसराचे सौंदर्यीकरण केले. या ठिकाणी वृक्षारोपन केले. टायर आणि कुंड्या रंगरगोटी करुन परिसराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांसाठी येथे पाळणे लावले. पुतळ्याच्या परिसरात बांबुचे कुंपन तयार केले. त्यामुळे या चौकाचा चेहरा मोहरा बदलला होता. या ठिकाणी बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था केल्याने संध्याकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक येथे येऊन बसत होते. मात्र काही असामाजिक तत्वांकडून या सौंदर्यीकरणाचे नुकसान आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे चित्र आहे.

Web Title: Turned on the hard work of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.