तब्बल नऊ वेळा सायकलने केली पंढरपूरवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:25 PM2017-11-14T23:25:23+5:302017-11-14T23:25:41+5:30
सायकलने तब्बल नऊ वेळा पंढरपूरची वारी करुन गोंदिया जिल्ह्यातील ६३ वर्षीय व्यक्तीने विठ्ठलभक्त आणि तरुणपिढीसमोर आदर्श ठेवला आहे.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सायकलने तब्बल नऊ वेळा पंढरपूरची वारी करुन गोंदिया जिल्ह्यातील ६३ वर्षीय व्यक्तीने विठ्ठलभक्त आणि तरुणपिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे या विठ्ठल भक्ताचे जिल्ह्यात सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. प्रदीप अनंतराम वाढई, रा.गुदमा, जिल्हा गोंदिया असे सायकलने नऊवेळा पंढरपूरची वारी पूर्ण करणाºया डॉक्टरचे नाव आहे. ते सालेकसा येथे आयुर्वेदीक दवाखाना चालवितात. एक सल्लागार चिकित्सकाची भूमिका सुध्दा ते बजावित आहेत. ते आपल्या उपचार पध्दतीने अनेकांचे रोग दूर करण्यात यशस्वी राहिले. अनेक वर्षापासून सालेकसात दवाखाना चालवित आयुर्वेदीेक औषधोपचार करतात.
त्यामुळे तालुक्यात ते सर्वत्र परिचित आहेत. डॉ. प्रदीप वाढई विठ्ठलभक्त असून दरवर्षी सायकलने पंढरपूरवारी करुन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात. त्यांचे वय ६३ वर्षाचे झाले तरी त्यांच्यातील उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. यंदा त्यांच्या पंढरपूर वारीचे हे नववे वर्ष होते.
सालेकसा येथून ते १९ आॅक्टोबर रोजी त्यांनी पंढरपूर जाण्यासाठी सायकलने यात्रा सुरु केली. गावातील लोकांनी त्यांना शुभेच्छा देत दिल्यानंतर ते पुढीेल प्रवासाला निघाले.
२५ दिवसाची पंढरपूर यात्रा पूर्ण करीत ते सोमवारी (दि.१४) रोजी परत आल्यानंतर सालेकसावासीयांनी त्यांचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. यावेळी सालेकसाचे प्रमुख सराफा व्यापारी व वरिष्ठ नागरिक यांनी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. श्यामसुंदर राठी, राजेश जैन, कोमल जैन, अवस्थी महाराज, राजू अग्रवाल, मुलचंद टेंभरे, दर्शन जैन, प्रभुदयाल असाटी, आशीष शेंडे, पोगळे, चौव्हाण, गौतम यांनी उपस्थित होते.