घोरपड शिकारप्रकरणी दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:26 PM2019-07-21T22:26:43+5:302019-07-21T22:27:11+5:30
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी वन्यजीव विभागाने विविध उपाय योजना केल्या आहेत. तसेच अभयारण्यात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांवर आळ बसला आहे.
तालुक्यातील कोसमतोंडी गावाजवळील मुरपारटोली येथील सुरेश लक्ष्मण सयाम रा. व त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेला टीकाराम यादोराव उईके हे बुधवारी नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करण्यासाठी गेले होते.दरम्यान ते घोरपडीची शिकार करून कंपार्टमेंट क्रमांक ९८ मधून आपल्या घराकडे जातांना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले.
वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींना मुद्देमालासह अटक केली.त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.ही कारवाई वन्यजीव गोंदियाचे क्षेत्र संचालक रामानुजन, उपसंचालक पुनम पाटे, सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे, वनक्षेत्र सहायक सुधीर ऊके, वनरक्षक महादेव बिसेन, शामू शरणागत, वनमजूर दयाराम श्यामकुवर यांनी केली.