दोन शेतमजूर नाल्यात गेले वाहून; गोंदियातील धक्कादायक घटना
By नरेश रहिले | Published: July 13, 2022 04:51 PM2022-07-13T16:51:28+5:302022-07-13T16:52:13+5:30
शोध बचाव पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे.
गोंदिया: दोन दिवसापासून संततधार झालेल्या पावसामुळे गोंदिया तालुक्यातील तुमखेडा खुर्द (लोधीटोला) येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांचा नाल्यातील पाण्यात ते वाहून गेले. ही घटना १३ जुलै रोजी सकाळी घडली.
आशिष धर्मराज बागडे (२३) व संजू प्रमोद बागडे (२५) रा. पूजारीटोला - लोधीटोला असे वाहून गेलेल्या शेतमजूरांची नावे आहे. त्यांना शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे बचावपथक नाल्यात उतरून शोध मोहीम राबवित आहेत. तुमखेडा खुर्द येथील शेतीच्या कामाकरीता जात असताना ते नाल्यात वाहून गेले.
शोध बचाव पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत शोध मोहीम सुरूच होती परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. घटनास्थळावर पोलीस व बचाव पथकाच्या लोकांनी काम सुरू केले. शोध मोहीम राबवितांना नागरिकांनी गर्दी केली होती.