महिला नागरी पतसंस्थेत अपहार प्रकरणी दोघांना अटक

By अंकुश गुंडावार | Published: May 17, 2023 11:10 AM2023-05-17T11:10:14+5:302023-05-17T11:10:23+5:30

महिला नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या विज बिल व नळाचे बिल अपहार प्रकरणी तिरोडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

Two arrested in case of embezzlement in women's civic credit institution | महिला नागरी पतसंस्थेत अपहार प्रकरणी दोघांना अटक

महिला नागरी पतसंस्थेत अपहार प्रकरणी दोघांना अटक

googlenewsNext

तिरोडा - महिला नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या विज बिल व नळाचे बिल अपहार प्रकरणी तिरोडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

तिरोडा महिला नागरी सहकारी संस्थेवर सध्या प्रशासक  असतानाही 538193 रुपयाचे अपहार झाला होता. इलेक्ट्रिक बिल व पाण्याचे बिल संकलन करणारे कर्मचारी रितेश मलेवार तसेच यांचे वर देखरेख करण्याची जबाबदारी असलेले शाखा व्यवस्थापक प्रभाकर निमजे यांचे विरोधात मुख्य प्रशासक तथा सहाय्यक निबंधक कार्यालय तिरोडा चे सहाय्यक अधिकारी श्रेणी-२  सुधीर शेंद्रे यांनी पोलिसात 2 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तिरोडा पोलिसांनी भादवि कलम 406-34 नुसार गुन्हा नोंद केला होता.

त्या अनुषंगाने दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. 16 मे रोजी न्यायालयाने 18 मे पर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी दिली आहे.

Web Title: Two arrested in case of embezzlement in women's civic credit institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.