धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:31 AM2021-04-09T04:31:00+5:302021-04-09T04:31:00+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू व डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते डॉ. जयंत महाखोडे, डॉ. सुरेश घाटोले, ...
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू व डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते डॉ. जयंत महाखोडे, डॉ. सुरेश घाटोले, डॉ. महेश हेडाऊ, प्रा. दत्ता नालमवार, प्रा. अरुण भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. अंजन नायडू यांनी आपल्या मनोगतात सामंजस्य करार करण्यामागील भूमिका व विद्यार्थ्यांना स्पर्धेमुळे होणारे फायदे विशद केले. तसेच प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे यांनी स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांकरिता भाषा कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आदी कौशल्ये विकसित होतात असे सांगितले. प्रास्ताविकातून डॉ. सुरेश घाटोले यांनी सामंजस्य कराराअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. या स्पर्धेत बी. एस्सी. प्रथम सत्राच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून तर ७२ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यात सहभाग नोंदविला होता. या परिसंवाद स्पर्धेचे आयोजन गुगल मिट घेण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आचल ठाकरे तर तर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली नायक हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रा. अरुण भोयर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. जयंत महाखोडे, प्रा. दत्ता नालमवार, प्रा. अरुण भोयर, प्रा. भाविक राठोड, सुरेंद्र शहारे व बी. एस्सी. प्रथम सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.