रेल्वेच्या धडकेत दोन हरीण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:56 PM2018-01-01T23:56:56+5:302018-01-01T23:57:18+5:30
गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीच्या धडकेत दोन हरीण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील पिंडकेपार रेल्वे स्थानकाजवळ घडली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीच्या धडकेत दोन हरीण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील पिंडकेपार रेल्वे स्थानकाजवळ घडली.
रेल्वे कर्मचाºयांनी या घटनेची माहिती गोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांना दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रेल्वे गाडीच्या धडकेत ठार झालेल्या दोन्ही हरीणाचे वय चार ते सहा वर्ष असल्याचे सांगितले जाते. कुºहाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांना बोलावून दोन्ही हरीणाचे श्वविच्छेदन करुन त्यांना गाडण्यात आले. दरम्यान काही प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हरीणाच्या तोंडातून फेस निघत होते. त्यामुळे आधी त्यांची शिकार करुन नंतर त्यांना रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी तसे काही घडले नसल्याचे सांगतिले. रेल्वे गाडीच्या धडकेनेच दोन्ही हरीणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा परिसर नवेगावबांध- नागझिरा अभयारण्याला लागून असल्याने या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यातूनच हा अपघात घडल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे वन्यजीव विभाग आणि प्रशासनाने उपाय योजना राबविण्याची मागणी पुढे येत आहे.
मागील वर्षभरात सहा वन्यप्राण्यांचा मृत्त्यू
मागील वर्षभरात जिल्ह्यात रस्ता अपघातात सहा वन्यप्राण्यांचा मृत्त्यू झाला आहे. २९ डिसेंबरला गोंदिया-आमगाव मार्गावर दुचाकीने हरणाला धडक दिल्याने एका हरणाचा मृत्यू झाला होता. तर याच मार्गावर यापूर्वी एक बिबट, ३ चितळ आणि एका नीलगायचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.