रेल्वेच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:07 PM2020-01-04T22:07:00+5:302020-01-04T22:07:26+5:30

आज दुपारच्या सुमारास अशीच घटना घडली.

Two deer killed in train collision | रेल्वेच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू

googlenewsNext

गोंदिया : चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगली रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने अनेकदा जंगली प्राणी जंगलातून या रेल्वे लाईनच्या दुतर्फा ये-जा करत असतात. त्यामुळे ट्रेनच्या धडकेत अनेकदा वन्यजीवांचा मृत्यू होतो.

आज दुपारच्या सुमारास अशीच घटना घडली. गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात होती. हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे लाईन पार करीत असतांना २ हरणांना लोकल ट्रेनने धडक दिली. या धडकेत दोन्ही हरणांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही मृतक हरीणांना गाडण्यात आले आहे.

दरम्यान, पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला तारांचे कंपाउंड करण्याची मागणी अनेकदा वन्य प्रेमींनी व गावकऱ्यांनी केली आहे. कंपाउंड झाले की या रेल्वे मार्गावर कोणतेही वन्यप्राणी किंवा गायी येणार नाहीत व त्यांचा मृत्यू टाळेल. मात्र, याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Two deer killed in train collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात