‘आमची शाळा आदर्श शाळा’ स्पर्धेत २५५ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:57 PM2019-08-28T21:57:42+5:302019-08-28T21:58:34+5:30

शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिती, आवश्यक शैक्षणिक तक्ते, तरंग चित्रे इत्यादींचा समावेश आहे.

Two Hundred Fifty Five schools in the 'Our School Model School' competition | ‘आमची शाळा आदर्श शाळा’ स्पर्धेत २५५ शाळा

‘आमची शाळा आदर्श शाळा’ स्पर्धेत २५५ शाळा

googlenewsNext
ठळक मुद्देअदानी देणार पुरस्कार : जिल्ह्यातील ८५ केंद्रातील जि.प.शाळांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर ‘आमची शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाची संकल्पना जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी मांडली.जिल्ह्यातील ८५ केंद्रांमधील २५५ शाळा या स्पर्धेत आहेत.
या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०४८ शाळांपैकी ८५ केंद्रामधील २५५ शाळा स्पर्धेत आहेत. या उपक्रमासाठी १०० गुण देण्यात आले आहेत. त्यातील ५८ गुण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पडताळणीवर तर ४२ गुण हे शाळेच्या भौतिक सोयीसुविधेवर देण्यात आले आहे. या उपक्रमातील प्रत्येक शाळा दर महिन्याच्या ५ तारखेला स्वत:च्या शाळेचे स्वंयमुल्यांकन करून दिलेल्या प्रश्नांची माहिती भरण्यात आली आहे. ज्या शाळांना सर्वाधीक गुण मिळतील अशा शाळांचे फेर मुल्यांकन जिल्हा परिषदतर्फे असलेल्या समितीने केले आहे. यंदाच्या सत्रासाठी प्रायेगीक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जर ह्या उपक्रमाला भरघोष प्रतिसाद मिळाला तर पुढच्या वर्षीही या उपक्रमाला जोमाने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला पुरस्कार देण्याचाही निर्णय घेण्याचा निर्णय सुरू आहे. शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यकच आहे. याकडे लक्ष देण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे काम सुरू आहे.
शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिती, आवश्यक शैक्षणिक तक्ते, तरंग चित्रे इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बस्कर पट्या, डेस्कबेंच उपलब्ध आहेत काय, स्वच्छ व निर्जतूंक पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते काय, शाळा डिजीटल आहे काय, शालेय परसबाग व बाग स्थायी स्वरुपात उपलब्ध आहे काय यावर मुल्यांकन केले आहे.
मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे काय, स्वच्छतागृहामध्ये कमोड टॉयलेट, हॅन्ड्रील्स, कमोड चेअरची सुविधा आहे काय, स्वयंपाकगृहात अन्य धान्य साठवणूक व वस्तूवरील नामनिर्देशन सुव्यवस्थीत केले का,अन्य धान्य शिजवितांना पूर्णपणे स्वच्छता राखली जाते का,उरलेल्या निरुपयोगी अन्नाची योग्य विल्हेवाट करण्यात येते का, पोषण आहार शासनाच्या निकषानुसार देण्यात येत असून त्या संबंधी नोंदी ठेवण्यात येतात का, शासन निकषानुसार स्वयंपाकगृहात शालेय पोषण आहार तक्ता (मेनू) लावण्यात आला का, आठवड्यातून एकदा पुरक आहार देण्यात येतो का याची खात्री करुनच गुण देण्यात येणार आहे.
शाळेतील ग्रंथालयात किमान २०० पुस्तके असावेत. पुस्तकांचे विषयनिहाय वर्गीकरण करुन पुस्तकाची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली का, ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग विद्यार्थी करतात का,शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग नोंदविला असून शिष्यवृत्तीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली का, शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत सहभाग नोंदविला असून नवोदय विद्यालयासाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली का,विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का,नाविण्यपुर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अनुसरुन शाळा पातळीवरती उपक्रम घेण्यात येतात का,विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, क्षेत्रभेट इत्यादीचे आयोजन करण्यात येते का, शासकीय उपक्रमांना अनुसरुन गावपातळीवर शाळेद्वारे प्रभातफेरी, समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात का, त्याच्या नोंदी फोटोसह ठेवण्यात येतात काय अशा विविध मुद्यांवर मूल्यांकन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता
विद्यार्थ्याचे गणवेश स्वच्छ व निटनेटके आहे काय, विद्यार्थ्यांची वैयक्तिक तपासणी केली जाते काय (आठवड्यातून एकदा-दोनदा), लोकसहभागाकडे नजर टाकतांना शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात येते काय, माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेच्या विकासात रोख, वस्तू स्वरुपात मदत करण्यात आली काय, माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत काय यावरही गुण दिले आहेत.
शाळांना कागदपत्रांपासून मुक्तता
शिक्षकांना विविध कामे असल्यामुळे त्यांच्यावर या उपक्रमाची माहिती देण्याचे काम आहे.त्यांना अधिक काम होऊ नये यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शाळांकडून माहिती भरुन घेण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही शाळा कागदोपत्री गुंतल्या नाहीत.

मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला आमची शाळा आदर्श शाळा’ उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात राबविला जात आहे.यातील पुरस्कार प्राप्त शाळांना अदानी समूहाकडून बक्षिसे दिले जाणार आहेत.
-राजकुमार हिवारे
शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.गोंदिया.

Web Title: Two Hundred Fifty Five schools in the 'Our School Model School' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा