पोलिस-नक्षल चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; प्रत्येकी १४ लाखांचे होते बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:59 PM2023-04-22T12:59:16+5:302023-04-22T12:59:46+5:30
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील घटना
अंकुश गुंडावार
गोंदिया : मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट परिसरात शनिवारी (दि.२२) पहाटे ३ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन प्रमुख महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना पोलिसांनी ठार केले. विशेष म्हणजे या दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या कारवाईने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जाते.
पोलिस अधीक्षक समीर सौरभ दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ३ वाजता बालाघाट जिल्ह्यातील गढी पोलिस स्टेशन हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यात जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. सुनीता टाडा दलमच्या भोरम देव एरिया कमांडरमध्ये एसीएम होत्या. ती सध्या विस्तार दलममध्ये काम करीत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची गार्ड होती. ती खटिय मोचा दलममध्ये होती. तर सध्या ती विस्तार दलममध्ये सक्रिय होती. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहे.
गेल्या वर्षीही मध्यप्रदेश पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. दरम्यान या कारवाईनंतर आयजीपी बालाघाट संजय कुमार, बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ आणि हॉक फोर्सचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.